Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: विराट मनानंही 'किंग'! बॉल बॉयची विनंती झटक्यात केली पूर्ण, पाहा Video

विराट कोहलीने बॉल बॉयची विनंती ऐकून ती लगेचच पूर्ण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli's gesture for ball boy at Wankhede Stadium: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीचा विराट कोहलीचा एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेक चाहत्यांची मनंही जिंकली आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी बेंगलोरचा स्टार फलंदाज सराव करून परत ड्रेसिंग रूमकडे चालला होता. यावेळी वानखेडे स्टेडियमच्या पायऱ्या चढत असताना त्याला मैदानावरील एका बॉल बॉयने आवाज दिला. त्याने विराटकडे पाहून त्याची स्वाक्षरी असलेल्या बॅट देण्याबद्दल हातवारेही केले.

विराटही त्याला पाहिल्यानंतर काही क्षणांसाठी थांबला आणि त्याने त्याची विनंती ऐकली. त्यानंतर विराटने एका स्टाफमधील सदस्याला त्या बॉल बॉयला बॅट देण्यास सांगितले. या घटनेच्या व्हिडिओवर सध्या व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहेत.

सामन्यापूर्वी सचिनची घेतली भेट

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटने मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही भेट घेतली. त्याच्या भेटीदरम्यानचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये विराट आणि सचिन गप्पा मारताना दिसत असून त्यांच्या मजेशीर संवादही झाल्याचे दिसते. हा व्हिडिओही चर्चेचा विषय ठरला होता.

विराट सध्या चांगल्या फॉर्मममध्ये

विराट आयपीएल 2023 स्पर्धेत सध्या दमदार फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. त्याने आत्तापर्यंत 11 सामन्यांमध्ये खेळताना 42 च्या सरासरीने आणि 133.76 च्या स्ट्राईक रेटने 420 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 अर्धशतकांचाही समावेश आहे.

विराटने याच हंगामात खेळताना आयपीएल कारकिर्दीत ७००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा ओलांडला आहे. तो आयपीएलमध्ये 7000 धावा करणारा पहिलाच खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 234 सामन्यांमध्ये 36.50 च्या सरासरीने आणि 129.41 च्या सरासरीने 7044 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा आणि 50 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT