Wasim Jaffer
Wasim Jaffer Dainik Gomantak
क्रीडा

विराटच्या फलंदाजीची ऑस्ट्रेलियन चॅनलने उडवली खिल्ली, वसीम जाफरने घेतला क्लास!

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर टीका केल्याबद्दल भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) ऑस्ट्रेलियाच्या चैनल 7 क्रिकेटला ( 7 Cricket) चोख प्रत्युत्तर दिले आहे. चॅनल 7 ने कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल ट्विट केले आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2021 हे वर्ष खूप वाईट गेले. या वर्षात त्याला संघासाठी विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 11 सामन्यांमध्ये चार अर्धशतकांसह 536 धावा केल्या असून एकही शतक झळकावलेले नाही. यादरम्यान त्याची सरासरी 28.21 होती. त्याच वेळी, त्याची कारकीर्दीची सरासरी पाहिली तर ती 50 पेक्षा जास्त आहे.

दरम्यान, चैनल 7 ने एक पोस्ट ट्विट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी कोहलीची 2019 पासून आतापर्यंतची आकडेवारी ट्विट केली आहे. या दरम्यान कोहलीची कसोटी सरासरी 37.17 आहे. या ट्विटमध्ये चॅनलने ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कचे (Mitchell Stark) आकडे देखील ट्विट केले आहेत. 2019 पासून स्टार्कची सरासरी कोहलीच्या तुलनेत जास्त असून ती 38.63 एवढी आहे. चॅनलने या दोघांचे एकत्र फोटोही ट्विट केले आहेत. 7 क्रिकेटने त्यावर 'बेस्ट फिगर्स ऑफ द डे' असेही रिट्वीट करत लिहिले. या प्रकरणाबाबत जाफर यांनी या चॅनलला चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

स्टीव्ह स्मिथबद्दलही ट्विट

चॅनलने स्टार्क आणि कोहलीचे आकडे ट्विट करताना, जाफरने स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) तुलना नवदीप सैनीशी केली आहे. जाफरने ट्विट केले, "ODI कारकिर्दीची सरासरी: नवदीप सैनी (Navdeep Saini) 53.50, स्टीव्ह स्मिथ 43.34" एवढी आहे.

दरम्यान, सैनीची वनडे सरासरी ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथपेक्षा जास्त आहे. सैनीने आतापर्यंत वनडेमध्ये पाच डाव खेळले असून 107 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या 45 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सैनीही तीनदा नाबाद राहिला आहे. वनडेत त्याचा स्ट्राईक रेट 80 आहे. त्याचबरोबर स्मिथने आपल्या कारकिर्दीत 128 एकदिवसीय सामने खेळले असून 4300 हून अधिक धावा केल्या आहेत.

कोहलीच्या शतकाचा दुष्काळ कायम

कोहलीने 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) एकही शतक झळकावलेले नाही. त्याचा हा शतकांचा दुष्काळ 2021मध्येही कायम राहिला आहे. दरम्यान तो धावांसाठी संघर्ष करत आहे. टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही कोहलीच्या हातातून गेले असून त्याने स्वतः टी-20 चे कर्णधारपद सोडले आहे. शेवटच्या वेळी त्याने आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे (Team India) कर्णधारपद भूषवले होते आणि त्याआधीही त्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सिलेक्टर्संनी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुनही हटविण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT