Wanindu Hasaranga  Dainik Gomantak
क्रीडा

Wanindu Hasaranga: बहिणीच्या लग्नात हसरंगाचं दिसलं निराळं रुप, धाय मोकलून रडताना Video व्हायरल

Video: वनिंदू हसरंगाला धाकट्या बहिणीच्या लग्नात अश्रू अनावर झाले होते.

Pranali Kodre

Wanindu Hasaranga gets emotional at Sister Wedding:

भावा-बहिणीचं नातं हे इतर नात्यांहून निराळं असतं. ते एकमेकांशी किती भांडले, कितीही दूर गेले तरी त्यांच्यातील प्रेम त्यांना नेहमीच एकमेकांशी बांधून ठेवते. याचाच प्रत्येय देणारा वनिंदू हसरंगाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाचा त्याच्या बहिणीच्या लग्नात भावूक झालेला एका व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये हसरंगाचे भावनिक रुप सर्वांनाच पाहायला मिळाले आहे.

हसरंगाला छातू डी सिल्वा ही लहान सख्खी बहीण आहे. तिचे नुकतेच लग्न झाले. या लग्नातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की जेव्हा त्याची बहीण त्याच्या जवळ येते, तेव्हा तो स्वत:च्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु, जेव्हा त्याची बहीण त्याला मिठी मारते, तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यातू घळाघळा अश्रू बाहेर येतात. त्यानंतर हसरंगा त्याच्या बहिणीचे आणि मेव्हण्याचे अभिनंदन करतो. या भावा-बहिणीच्या व्हिडिओने अनेक क्रिकेट चाहत्यांनाही भावूक केले आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही या व्हिडिओवर दिल्या आहेत.

वनिंदू हसरंगाने घेतली कसोटीतून निवृत्ती

काही दिवसांपूर्वीच 26 वर्षीय हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हसरंगाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कारकिर्द लांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

त्याने 26 डिसेंबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. तो त्याच्या कारकिर्दीत 4 कसोटी सामने खेळला. त्याने या 4 सामन्यातील 7 डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकासह 196 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो अखेरचा कसोटी सामना 21 ते 25 एप्रिल 2021 दरम्यान बांगलादेशविरुद्ध खेळला.

हसरंगा कसोटीतून निवृत्त झाला असला, तरी तो वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात श्रीलंकेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने 48 वनडे सामने खेळले असून 4 अर्धशतकांसह 832 धावा केल्या आहेत आणि 67 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 58 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामने खेळताना 1 अर्धशतकासह 533 धावा केल्या आहेत. तसेच 91 विकेट्स घेतल्या आहेत.

आता तो 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT