Attack on Sri Lanka team: गोळीबार अन् जीवघेणा हल्ला, जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीलंकन टीमवर ओढावलेले प्राणघातक संकट...

बरोबर 14 वर्षांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता.
Attack on Sri Lanka team
Attack on Sri Lanka teamDainik Gomantak
Published on
Updated on

Attack on Sri Lanka team in Pakistan: क्रिकेटच्या मैदानात आत्तापर्यंत अनेक दु:खद घटना घडल्या आहेत. त्यातही 3 मार्च 2009 हा दिवस क्रिकेटमधील काळ्या दिवसांपैकी एक. कारण याचदिवशी श्रीलंकन संघाच्या बसवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात काही खेळाडू जखमीही झाले होते.

झाले असे की फेब्रुवारी-मार्च 2009 दरम्यान श्रीलंकेचा संघ क्रिकेट मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी कसोटी मालिका सुरू होता. पहिला सामना अनिर्णित राहिला होता.

त्यानंतर 1 मार्चपासून दुसरा कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरु झालेला. हा सामना सुरु असतानाही कोणीही विचार केला नसेल अशी गोष्ट तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी घडली.

Attack on Sri Lanka team
IND vs AUS, 3rd Test: ऑस्ट्रेलियाने इंदूरचं मैदान मारलं! भारताचा 9 विकेट्सने लाजीरवाणा पराभव

श्रीलंकेचा पहिला डाव 606 धावांवर संपल्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानने 1 बाद 110 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ 3 मार्चला सुरू होणार होता. त्यामुळे मैदानावरून येण्यासाठी सकाळी हॉटेलमधून श्रीलंका संघ निघाला.

श्रीलंका संघाच्या बसमध्ये त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाडू होते. त्यांच्या बसच्या मागे आयसीसी सामनाधिकाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बसही होती. तसेच त्यांच्या रक्षणासाठी पोलिसांची गाडीही होती.

पण, स्टेडियमपासून बस काही अंतरावरच असताना अचानक 12 शस्त्रधारी दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. हे पाहून खेळाडू घाबरले. संघाचा मसाजर पुढे बसले होते. त्यांनी लगेचच खेळाडूंना खाली वाकण्यास सांगितले. त्यानुसार खेळाडू बसमध्ये खाली लोटले होते.

त्यावेळी श्रीलंकन संघाच्या बस ड्रायव्हरने धैर्य दाखवले. त्याने स्वत:चा जीव वाचवताना बस जितक्या शक्य होईल तितक्या लवकर स्टेडियमपर्यंत पोहचवण्याची खबरदारी घेतली.

यावेळी तिलकरत्ने दिलशानने त्याला खाली वाकून रस्ता सांगण्याचे काम केले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी काही ग्रेनेड्स बसच्या खालीही टाकले होते. पण ड्रायव्हरने ते फुटण्यापूर्वी बस पुढे नेली होती.

अखेर बस स्टेडियममध्ये पोहचली. पण तोपर्यंत काही खेळाडू जखमी झाले होते. त्यातही थिलन समरवीरा आणि थरंगा परनविताना सर्वाधिक जखमी झाले होते. समरवीराच्या पायाला गोळी लागली होती.

तर थरंगाच्या छातीला गोळी घासून गेली होती. कुमार संगकाराच्या खांद्याला दुखापत झाली होती, तसेच मेंडीस, पॉल फेब्रेस, चामिंडा वास यांनाही दुखापती झाल्या होत्या.

Attack on Sri Lanka team
India vs Sri Lanka ODI: इतिहास घडला! भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी आजवरचा सर्वात मोठा विजय

याशिवाय आयसीसी सामनाधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसच्या ड्रायव्हरला या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता, त्यामुळे एका पोलिस अधिकाऱ्यानी त्यांची बस स्टेडियमपर्यंत आणली होती. त्यावेळी त्या मिनीबसमध्ये ख्रिस ब्रॉड, सायमन टॉफेल, अहसान रझा हे देखील होते. त्यावेळी रझा यांच्या पोटात गोळी लागली होती.

दरम्यान, स्टेडियममध्ये पोहचल्यानंतर समरवीरा, थरंगा परनविताना, रझा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तसेच काही तास खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये होते. त्यानंतर खेळाडूंना स्टेडियममधूनच एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर त्याच रात्री श्रीलंकेचा संपूर्ण संघ मायदेशी परतला होता.

दरम्यान, या हल्ल्यात 6 पोलिस अधिकारी आणि 2 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तसेच रिपोर्ट्सनुसार हा हल्ला लष्कर-ए-झंगवी या दहशदवादी संघटनेने केला असल्याचे समोर आले होते.

पण, या हल्ल्यानंतर मात्र जवळपास एक दशक पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्री क्रिकेट खेळवण्यात आले नव्हते. सर्वच संघांनी पाकिस्तानला जाण्यास नंतर नकार दिला होता. पण अखेर काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघ 2009 च्या दरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. पण सुरक्षेच्या कारणाने आणि नंतर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर हा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे पाकिस्तानने श्रीलंका क्रिकेट संघाला आमंत्रित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com