Wanindu Hasaranga Dainik Gomantak
क्रीडा

Wanindu Hasaranga: वयाच्या 26 व्या वर्षीच श्रीलंकेच्या हसरंगाचा अचानक कसोटीला अलविदा, 'हे' कारण आले समोर

Wanindu Hasaranga Retirement: स्टार अष्टपैलू क्रिकेटर वनिंदू हसरंगाने वयाच्या 26 व्या वर्षीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Pranali Kodre

Sri Lanka's Wanindu Hasaranga announced retirement from Test cricket:

श्रीलंकेचा प्रमुख अष्टपैलू क्रिकेटपटू वनिंदू हसरंगाने मंगळवारी मोठा निर्णय घोषित केला. त्याने कसोटीतून निवृत्ती घेत असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळवले आहे. याबद्दल श्रीलंका क्रिकेटनेच माहिती दिली आहे.

26 वर्षीय वनिंदू हसरंगाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कारकिर्द लांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याबद्दल श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी सांगितले की 'आम्ही त्याचा निर्णय स्विकारला आहे आणि खात्री आहे तो पुढे आमच्या मर्यादीत षटकांच्या योजनेतील महत्त्वाचा भाग राहिल.'

दरम्यान, हसरंगाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जरी त्याची वेगळी ओळख बनवली असली, तरी कसोटीत त्याला अद्याप फारशी छाप पाडता आली नव्हती.

त्याने 26 डिसेंबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. तो त्याच्या कारकिर्दीत 4 कसोटी सामने खेळला. त्याने या 4 सामन्यातील 7 डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकासह 196 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो अखेरचा कसोटी सामना 21 ते 25 एप्रिल 2021 दरम्यान बांगलादेशविरुद्ध खेळला.

तथापि, हसरंगाने वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. तो आशिया चषक 2022, टी20 वर्ल्डकप 2021 आणि 2022 या मोठ्या स्पर्धांमध्येही श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये होता.

त्याने 2 जुलै 2017 रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 48 वनडे सामने खेळले असून 4 अर्धशतकांसह 832 धावा केल्या आहेत आणि 67 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने 58 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामने खेळताना 1 अर्धशतकासह 533 धावा केल्या आहेत. तसेच 91 विकेट्स घेतल्या आहेत.

तो आगामी 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका या देशात सुरु होणाऱ्या आशिया चषकातही श्रीलंकेच्या मुख्य खेळाडूंपैकी एक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT