Wanindu Hasaranga X/ICC
क्रीडा

SL vs ZIM, ODI: RCB ने सोडलेल्या हसरंगाचा धमाका! 19 धावांत 7 विकेट्स घेत मुरलीधरनच्या विक्रमालाही टाकलं मागे

Wanindu Hasaranga: गुरुवारी श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने वनडेत 19 धावांत 7 विकेट्स घेण्याची कामगिरी करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.

Pranali Kodre

Sri Lanka vs Zimbabwe, 3rd ODI at Colombo, Wanindu Hasaranga 7 Wickets haul:

गुरुवारी (11 जानेवारी) श्रीलंका क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत 8 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना पावसामुळे 27-27 षटकांचा करण्यात आला होता. दरम्यान, श्रीलंकेच्या या विजयात फिरकीपटू वनिंदू हसरंगाने मोलाचा वाटा उचलला. याबरोबर त्याने अनेक विक्रमही नावावर केले.

वनिंदू हसरंगाने या सामन्यात 5.5 षटके गोलंदाजी करताना 19 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने वनडे क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवली. तसेच श्रीलंकेकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवताना मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाला मागे टाकले.

वनडेमध्ये एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या चांमिंडा वासच्या नावावर आहे. चामिंडा वासने 8 डिसेंबर 2001 रोजी झिम्बाब्वे विरुद्धच 8 षटकात 19 धावा देत 8 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे श्रीलंकेकडून वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रमही चामिंडा वासच्याच नावावर आहे. या यादीत आता हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने मुरलीधरनने भारताविरुद्ध 27 ऑक्टोबर 2000 रोजी शारजाहला 10 षटकात 30 धावा देत 7 विकेट्स घेतलेल्या कामगिरीला मागे टाकले आहे.

वनडेत एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन

  • 8/19 - चामिंडा वास (श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, कोलंबो, 2001)

  • 7/12 - शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, प्रोविडन्स, 2013)

  • 7/15 - ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, पॉचेफस्ट्रूम, 2003)

  • 7/18 - राशिद खान (अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रॉस आयलेट, 2017)

  • 7/19 - वनिंदू हसरंगा (श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, कोलंबो, 2024)

  • 7/20 - अँड्र्यू बिचेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गकेबेरा, 2003)

  • 7/30 - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका विरुद्ध भारत, शारजाह, 2000)

हसरंगाचे पुनरागमन

हसरंगा ऑगस्टपासून श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याला आशिया चषक 2023 आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धाही खेळता आली नाही. मात्र, त्याने गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केले.

हसरंगा यंदा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. हसरंगा गेल्या काही काळापासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. मात्र, २०२४ च्या लिलावात त्याला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे.

श्रीलंकेने जिंकला सामना

हसंरगाने घेतलेल्या 7 विकेट्समुळे झिम्बाब्वेचा डाव 22.5 षटकात 96 धावांवरच संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून सलामीवीर जॉयलॉर्ड गम्बी याने सर्वाधिक 29 धावा केल्या. बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना हसरंगा व्यतिरिक्त दिलशान मदुशंका, महिश तिक्षणा आणि जनिथ लियानागे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग श्रीलंकेने 16.4 षटकातच पूर्ण केला. श्रीलंकेकडून कर्णधार कुशल मेंडिसने नाबाद 66 धावांची खेळई केली. तसेच शेवॉन डॅनिएलने 12 आणि सदिरा समरविक्रमाने नाबाद 14 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT