Beach VolleyBall  Google Image
क्रीडा

World Beach Volleyball: गोव्यातील 'या' किनाऱ्यावर रंगणार जागतिक बीच व्हॉलिबॉल स्पर्धा; देशाला प्रथमच यजमानपद

आमदार जीत आरोलकर आयोजन समितीच्या अध्यक्षपदी

किशोर पेटकर

Volleyball World Beach Pro Tour 2023: जागतिक बीच व्हॉलिबॉल प्रो-टूर स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले असून राज्यात आणि देशातही ही स्पर्धा प्रथमच खेळली जाईल.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांची स्पर्धेच्या आयोजन समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आमदार आरोलकर माजी व्हॉलिबॉलपटू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार जागतिक बीच व्हॉलिबॉल प्रो-टूर स्पर्धा 19 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत होईल. स्पर्धा दक्षिण गोव्यातील वार्का येथील समुद्रकिनारी होईल, अशी माहिती आमदार आरोलकर यांनी दिली.

व्हॉलिबॉल वर्ल्ड यांनी या स्पर्धेचे गोव्याला यजमानपद बहाल केले आहे. स्पर्धेत जगभरातील विविध देशातील संघ भाग घेतील. चेन्नईस्थित मरिना बीच स्पोर्टस क्लब गोव्यातील जागतिक स्पर्धेचे आयोजक आहेत.

पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जागतिक बीच व्हॉलिबॉल प्रो-टूर स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT