WI vs IND, Live Streming: फॅन्ससाठी खूशखबर! फ्रीमध्ये पाहू शकणार भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील मॅच, कसं घ्या जाणून
India Tour of West Indies, Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील सामना प्रसरणाचे डिजिटल हक्क रिलायन्स इंडस्ट्रीची मालकी असलेल्या जिओ सिनेमाने विकत घेतले आहेत. त्यामुळे साधारण महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने ऑनलाईन जिओ सिनेमावर दिसणार आहेत
दरम्यान जिओ सिनेमाने असेही घोषित केले आहे की कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डवरून हे सामने मोफत पाहाता येणार आहे. म्हणजेच आता हे सामने पाहण्यासाठी चाहत्यांना सब्सक्रिब्शन घेण्याची गरज लागणार नाही.
तसेच चाहते इंग्लिश, हिंदी, भोजपूरी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या सात भाषेत सामन्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत. यापूर्वी जिओ सिनेमाने आयपीएल २०२३ स्पर्धेचेही लाईव्ह प्रसारण केले होते.
असा आहे वेस्ट इंडिज दौरा
बीसीसीआयने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.
असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका
20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद
वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
आशिया चषक आणि वर्ल्डकपही पाहाता येणार विनामुल्य
काही दिवसांपूर्वीच हॉटस्टारनेही घोषित केले होते की ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणारा आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणारा वनडे वर्ल्डकप सर्व मोबाईन फोन युजर्सला विनामुल्य पाहाता येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.