Vladimir Putin and Chess player Garry Kasparov  Dainik Gomantak
क्रीडा

'खोटं बोलण्यात पुतिन माहिर' पुढचा क्रमांक चीन-तैवानचा! रशियन खेळाडूची टीका

पाश्चात्य देशांनी रशियन राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे ऐकले असते तर युद्ध टाळता आले असते

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. युक्रेनवर आक्रमण करण्याच्या रशियाच्या कृतीचा सर्वत्र निषेध होत आहे. आता रशियाचे बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर निशाणा साधला आहे. गॅरी कास्परोव्ह (Chess player Garry Kasparov) यांनी पुतीन यांच्याकडे खोटे बोलण्याचा मोठा रेकॉर्ड असल्याचे म्हटले आहे.

इंडिया टुडेशी बोलताना गॅरी कास्पारोव्ह म्हणाले, 'पुतिन यांच्या व्यक्तिरेखेतील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे खोटे बोलणे. खोटे बोलण्यात पुतीन माहिर आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते खोट बोलण्याच्या रेकॉर्ड ब्रेक करू शकतात. पुतिन अनेक वर्षांपासून युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यांचे हेतू न ओळखणे पूर्णपणे मूर्खपणाचे होते कारण त्यांनी युक्रेनला स्वतंत्र राज्य म्हणून कधीही मान्यता दिली नव्हती," असे गॅरी कास्परोव्ह म्हणाले. अनेक वर्षांपासून रशिया युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्व नाकारत आहे.

युद्ध टाळता आले असते

पुतीन हे अनेक दिवसांपासून युक्रेनमध्ये युद्धाची (Russia Ukraine War) तयारी करत होते. पाश्चात्य देशांनी रशियन राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे ऐकले असते तर युद्ध टाळता आले असते, असेही कास्परोव्ह यांचे मत आहे.

पुढचा क्रमांक चीन-तैवानचा!

सध्याचे संकट केवळ रशिया आणि युक्रेनवरचे नाही. हे संकट जगाला भोवणारे आहे. जागतिक सुरक्षा पायाभूत सुविधांबद्दल आहे. पुतिन यशस्वी ठरले तर पुढचा क्रमांक चीन-तैवानचा असेल असे रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर गॅरी कास्परोव्ह म्हणाले. माजी बुद्धिबळ विश्वपटू गॅरी कास्पारोव्ह पुतिन यांचे टीकाकार मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सलग पाच ट्विटमध्ये पुतिन यांच्यासाठी दिवाळखोर आणि वॉर मशीन असे शब्द वापरले होते. गॅरी कास्पारोव्हची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. ते जवळपास 20 वर्षे जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू होते, हा एक विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

SCROLL FOR NEXT