जळत्या इमारतीखाली गोंडस बाळाचा जन्म; युक्रेन सरकारनं ठेवलं 'स्वातंत्र्य' नाव

कीव्हमधील आश्रयस्थानात जमिनीखाली, जळत्या इमारती आणि रशियन रणगाड्यांच्या आवाजात गोंडस बाळाचा जन्म झाला
baby was born in one of the shelters in Kyiv
baby was born in one of the shelters in KyivTwitter/@MFA_Ukraine
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. बॉम्बसह क्षेपणास्त्राचेही हल्ले होत आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, रशियाने केलेल्या हल्ल्यात दहा ग्रीक नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या मारियुपोल शहराजवळ रशियन बॉम्बहल्ल्यात 10 ग्रीक नागरिक ठार झाले आहेत आणि 6 लोक गंभीर जखमी झाले आहेत. (Russia Ukraine War)

दरम्यान युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका आश्रय घेतलेल्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून या चिमुकलीच्या जन्माची माहिती फोटो शेअर करून दिली. आणि या चिमुकलीचं नाव 'स्वातंत्र्य' ठेवणार असल्याचे सांगितले आहे. 'कीव्हमधील आश्रयस्थानात जमिनीखाली, जळत्या इमारती आणि रशियन रणगाड्यांच्या आवाजात गोंडस बाळाचा जन्म झाला. आम्ही या बाळाचं नाव स्वातंत्र्य ठेवणार आहोत. युक्रेनवर विश्वास ठेवा #StandWithUkrain' असे परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत म्हटले आहे.

baby was born in one of the shelters in Kyiv
Russia-Ukraine War: किव्हच्या रस्त्यांवर झुंज

रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन सैन्याने अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. सुरक्षित निवारा आणि कुटूबियांच्या काळजीपोटी लोक शेजारील देशांमध्ये जात आहेत. एवढेच नव्हे तर युक्रेनच्या कीव्हसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी मेट्रो स्टेशन खाली आश्रय घेतला आहे. या ठिकाणी आसरा घेतल्यास रशियन बॉम्ब हल्ल्यापासून संरक्षण होईल, अशी आशा लोकांना आहे.

baby was born in one of the shelters in Kyiv
Russia-Ukraine War: युक्रेनमधील गोमंतकीय सुखरूप

रशिया-युक्रेन संघर्षाला आज तिसऱ्या दिवशी निर्णायक वळण मिळाले, रशियाच्या फौजा थेट युक्रेनच्या राजधानीमध्ये घुसल्याने आता रस्त्यांवरची लढाई सुरू झाली आहे. रशियन लष्कराने आज अनेक बहुमजली इमारतींवर थेट क्षेपणास्त्रे डागल्याने स्थानिकांना जीव वाचविण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. फ्रान्सप्रमाणेच अन्य युरोपीय देशांनीही युक्रेनला शस्त्र पुरवठा करायला सुरूवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com