World Cup 2011
World Cup 2011 Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: सचिनसाठी वर्ल्डकप जिंकला, तसा 'या' खेळाडूसाठी जिंका, दिग्गजाचे टीम इंडियाला साकडे

Pranali Kodre

Virender Sehwag on Team India in Cricket World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

दरम्यान, 12 वर्षांनंतर भारताच वर्ल्डकल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी 2011 साली भारतात वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. त्यावेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विश्वविजेतेपद नावावर केले होते.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तो अखेरचा वर्ल्डकप होता. त्यामुळे भारतीय संघाने हा त्याच्यासाठी जिंकला असल्याचे म्हटले होते. तसेच वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची चक्करही मारली होती.

दरम्यान, या गोष्टीची आठवण विरेंद्र सेहवागने करून दिली असून त्याने म्हटले आहे की आता वर्ल्डकप 2023 भारतीय संघाने विराट कोहलीसाठी जिंकायला हवा.

वर्ल्डकप 2023 वेळापत्रक घोषणेच्या कार्यक्रमावेळी बोलताना सेहवाग म्हणाला, 'आम्ही तो वर्ल्डकप तेंडुलकरसाठी खेळलो होतो. आम्ही विचार केलेला की जर आम्ही तो वर्ल्डकप जिंकला, तर सचिन पाजींसाठी खेळातून बाहेर जाताना शानदार क्षण बरोबर असेल. विराट कोहली आत्ता त्याच ठिकाणी आहे. सर्वांनी त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकण्याचा विचार करायला हवा. तो नेहमीच 100 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देतो.'

'मला वाटते विराट कोहलीही या वर्ल्डकपकडे असेच पाहात असेल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास 1 लाख लोक तुम्हाला पाहाणार आहेत. विराटला खेळपट्ट्या कशा खेळतात हे माहित आहे. त्यामुळे मला खात्री आहे तो खूप धावा करेल आणि तो भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी त्याचे सर्वोत्तम प्रयत्न करेल.'

दरम्यान, अहमदाबादमध्ये वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा पहिला आणि अंतिम सामन्याबरोबर बहुप्रतिक्षिक भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

सेहवाग भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल म्हणाला, 'प्रत्येकजण भारत - पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक आहे, तसा मी सुद्धा आहे. मला माहित नाही की त्यादिवशी काय होईल, पण जो संघ दबाव चांगल्याप्रकारे हाताळेल, तो संघ जिंकेल.'

वर्ल्डकप 2023 स्पर्धा एकूण 46 दिवस होणार असून या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT