Neeraj Chopra | Virender Sehwag Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: 'फेका तर असे फेका की चार लोक...', नीरजसाठी सेहवागने केलेली पोस्ट चर्चेत

Virender Sehwag Congratulate Neeraj Chopra: विरेंद्र सेहवागने वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या नीरज चोप्राचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले आहे.

Pranali Kodre

Virender Sehwag Congratulate Neeraj Chopra in funny way after Winning Gold Medal in World Athletics Championships 2023:

रविवारी (27 ऑगस्ट) रात्री भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याचदरम्यान भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागची नीरजचे अभिनंदन करणारी पोस्ट चर्चेत आली आहे.

सेहवाग बऱ्याचदा त्याच्या अनोख्या आणि मजेशीर सोशल मीडिया पोस्टसाठी चर्चेत असतो. यावेळीही त्याने नीरजचे गमतीशीर अंदाजात कौतुक केले आहे.

सेहवागने नीरजसाठी केलेल्या त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की 'फेका तर असे फेका की चार लोक बोलतील काय फेकतो यार. 88.17 मीटर दूर भाला फेकला आणि आपच्या चॅम्पियनने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले. मेगा रन सुरूच आहे.'

नीरजने रविवारी अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. तो वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

तसेच हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे आणि भारताचे एकूण तिसरे पदक आहे. नीरजने गेल्यावर्षी युजिनला झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच त्याआधी 2005 साली अंजू बॉबी जॉर्जने महिला लांब उडीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

दरम्यान नीरजने त्याचे हे सुवर्णपदक संपूर्ण भारताला समर्पित केले आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही याचा उल्लेख केला आहे. त्याने त्याचा आणि त्याच्याबरोबर रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंबरोबरील फोटो शेअर केला आहे.

तसेच त्याने पोस्टमध्ये लिहिले की 'वर्ल्ड चॅम्पियन. काय मस्त भावना आहे. हे भारतासाठी आहे. जय हिंद.'

दरम्यान, या स्पर्धेत भालाफेकीमध्ये रविवारी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 86.67 मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT