Virat's Fan Murder Rohit's Fan: मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर भारतात शनिवार, 15 ऑक्टोबरची पहाट उजाडली ती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohli) अटक करण्याच्या चर्चेने. शनिवार सकाळपासून #ArrestKohli ट्विटरवर ट्रेंड झाला. विराट कोहलीच्या एका चाहत्याने क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चाहत्याची हत्या केल्याची घटना तामिळनाडूत घडली. त्यामुळे ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.
विराट आणि रोहित या दोघांपैकी सर्वोत्तम कोण यावरून दोघा मित्रांमध्ये भांडणास सुरवात झाली होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी 21 वर्षीय युवकाला अटक केली आहे. एस. धर्मराज असे संशयिताचे नाव आहे. त्याने त्याचा मित्र पी. विग्नेश (वय 24) याची हत्या केली. हे दोघेही अरियालूर जिल्ह्यातील पोय्यूर गावचे रहिवासी आहेत.
दोघांमध्ये जेव्हा वादाला सुरवात झाली होती, त्यापुर्वी दोघांनीही दारू ढोसली होती. विग्नेश हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील मुंबई इंडियन्स या संघाचा पाठिराखा आहे, तर धर्मराज हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) चा चाहता आहे.
वादात विग्नेश याने आरसीबीच्या विराट कोहलीची खिल्ली उडवली. त्यामुळे संतापलेल्या धर्मराजने आधी दारूच्या बाटलीने विग्नेशवर हल्ला केला. नंतर त्याने क्रिकेटच्या बॅटने विग्नेशला मारहाण केली. यात घाव वर्मी बसून विग्नेशचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मल्लूर येथील सिडको औद्योगिक वसाहत भागात गुरूवारी रात्री ही घटना घडली.
दुसऱ्या दिवशी पहाटे येथील कामगारांना विग्नेशचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. विग्नेशने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तो नोकरीसाठी सिंगापूरला जाणार होता. धर्मराज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
आयपीएल स्पर्धेला भारतासह जगभरातून मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. शिवाय आयपीएल संघांचे चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमधील संघर्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.