T Dilip | India vs Afganistan X/BCCI
क्रीडा

Best Fielder Medal: 'तो फक्त त्याचं काम उत्तम करत नाही, तर इतरांना...', टी दिलीप यांनी केलं बेस्ट फिल्डरचं भरभरून कौतुक

India vs Afghanistan: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बेस्ट फिल्डर मेडल विजेत्याची घोषणा करण्यात आली.

Pranali Kodre

India vs Afghanistan, T20I Series, Best Fielder Medal:

वर्ल्डकप 2023 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला मेडल देण्याची परंपरा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी सुरू केली आहे. दरम्यान वर्ल्डकप 2023 नंतर आता प्रत्येक मालिकेनंतर हे मेडल देण्यात येते.

नुकतीच बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघांची टी20 मालिका संपली. या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आणि मालिकाही 3-0 अशा फरकाने आपल्या नावाववर केली. दरम्यान या मालिकेनंतरही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मेडल देण्यात आले.

या मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून टी दिलीप यांनी विराट कोहलीची निवड केली. या मेडल प्रदान सोहळ्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की तिसरा टी20 सामना संपल्यानंतर सर्व भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य ड्रेसिंग रुममध्ये बसले आहेत.

यावेळी टी दिलीप यांनी आधी सांगितले की 'खेळात जागृकता दाखवल्याने आपण मोठा प्रभाव पाडू शकतो हे आपण आज दाखवले. वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसनची चांगली कामगिरी राहिली.'

याशिवाय त्यांनी सांगितले की केवळ चांगला झेल आणि चांगला बचावच नाही, तर खेळाची समज असणे आणि एकमेकांना साथ देणेही महत्त्वाचे असते. यानंतर त्यांनी रिंकू सिंग आणि विराट कोहली या दोघांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या मेडलसाठी नामांकन दिले.

तसेच रिंकूच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक तर केलेच, पण विराटचे विशेष कौतुक केले. ते विराटबद्दल म्हणाले, 'हा खेळाडूने प्रत्येकवेळी दाखवून दिले आहे, जावे की न जावे याचा झटकन निर्णय घेणे, तो ज्याप्रकारे धावा वाचवतो, डाइव्ह मारतो, महत्त्वाच्या ठिकाणी असतो, तुम्ही त्याच्यावरील नजर हटवू शकत नाही, असा हा खेळाडू म्हणजे विराट कोहली.'

टी दिलीप म्हणाले, 'तो फक्त त्याचे काम उत्तम करत नाही, तर तो सर्वांना प्रेरणाही देतो. त्याच्याबरोबर खेळायला मिळणे ही एक उत्तम संधी आहे. मला आवडेल की एखाद्या युवा खेळाडूने येऊन त्याच्यासारखी कामगिरी करावी, त्याच्या अर्धेजरी केले, तरी संपूर्ण संघ वेगळा भासेल. आजचा विजेता विराट कोहली शिवाय अजून कोणी नाही.'

या संपूर्ण मालिकेत विराट कोहलीने क्षेत्ररक्षण दमदार राहिले होते. त्याने अनेक धावाही वाचवल्या.

या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT