Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings: किंग कोहलीचा मोठा पराक्रम, कसोटीत शतक झळकावताच घेतली मोठी झेप

Virat kohli Latest Test Ranking: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला.

Manish Jadhav

Virat kohli Latest Test Ranking: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला.

मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये कोहलीची बॅट शांत राहिली, पण जेव्हा त्याची बॅट तळपली तेव्हा सर्वजण पाहतच राहिले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून 186 धावांची मोठी खेळी झाली. त्याच्या या खेळीमुळे त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

ICC कसोटी क्रमवारीत मोठी झेप

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 186 धावांची इनिंग खेळली. यानंतर त्याला आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत मोठा फायदा झाला.

कोहलीने ताज्या ICC कसोटी क्रमवारीत 8 स्थानांची मोठी झेप घेतली असून, त्यानंतर तो आता 13व्या स्थानावर पोहोचला आहे.

जरी, तो अद्याप टॉप-10 च्या यादीतून बाहेर आहे, परंतु या एका शतकासह त्याला 54 रेटिंग मिळाले आहेत. कोहलीचे आता 705 रेटिंग गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाचा नंबर-1 फलंदाज

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशेन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 915 रेटिंग गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथही या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथचे 872 रेटिंग गुण आहेत. टॉप-10 मध्ये भारताचे दोन फलंदाज आहेत.

ऋषभ पंत एका स्थानाने खाली घसरुन 9व्या स्थानावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाने खाली येऊन 10व्या स्थानावर पोहोचला आहे.

कोहलीने कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले

विराट कोहलीने (Virat Kohli) चौथ्या कसोटीत आपले 28 वे शतक पूर्ण केले, हे शतक पूर्ण करण्यासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला. कोहलीची ही खेळी कोणत्याही घाईत दिसली नाही.

कोहलीने हळूहळू डाव पुढे नेत शतक पूर्ण केले. 28 वे शतक पूर्ण करताना त्याने केवळ 5 चौकार मारले. यासह हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे संथ शतक ठरले आहे.

यापूर्वी, त्याचे शतक इंग्लंडविरुद्ध आले होते, ज्यामध्ये त्याने शतक पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक 289 चेंडूंचा सामना केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT