Virat Kohli Stunning Catch Slips IND vs NZ 2026 Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

Virat Kohli Stunning Catch Slips IND vs NZ 2026: विराट कोहलीने स्लिपमध्ये घेतलेल्या अफलातून झेलने साऱ्यांचेच डोळे दिवपून टाकले.

Manish Jadhav

Virat Kohli Stunning Catch Slips IND vs NZ 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी तंतोतंत खरा ठरवला आणि किवी संघाचा डाव अवघ्या 185 धावात संपुष्टात आणला. या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी जितकी शिस्तबद्ध होती, तितकीच क्षेत्ररक्षणामध्येही खेळाडूंनी कमाल दाखवली.

दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) स्लिपमध्ये घेतलेल्या अफलातून झेलने साऱ्यांचेच डोळे दिवपून टाकले. सामन्याच्या 29व्या षटकात अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर नेथन स्मिथने खेळलेला चेंडू बॅकवर्ड स्लिपच्या दिशेने वेगाने जात असतानाच विराटने हवेत झेप घेत अफलातून झेल घेतला.

तिसऱ्या पंचांनी रिप्ले तपासल्यानंतर हा झेल पूर्णपणे अचूक असल्याचे स्पष्ट झाले. या शानदार झेलच्या जोरावर विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला. न्यूझीलंडच्या भूमीवर वनडे क्रिकेटमध्ये झेल टिपणारा विराट कोहली आता सर्वात ज्येष्ठ भारतीय खेळाडू बनला. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता, ज्याने 37 वर्षे 218 दिवसांच्या वयात न्यूझीलंडमध्ये हा पराक्रम केला होता, तर विराटने 37 वर्षे 364 दिवसांच्या वयात ही कामगिरी करुन स्वतःचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले.

या सामन्यात कर्णधार शुभमनचा चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय पूर्णपणे यशस्वी ठरला. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने आपल्या अचूक माऱ्याच्या जोरावर 10 षटकांत तब्बल 4 बळी टिपले, तर गुरनूर ब्रारने 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. याशिवाय, अंशुल कंबोजने 2 विकेट्स घेत मोलाची साथ दिली, जरी आकिब नबीला विकेट मिळाली नसली तरी त्याने नवीन चेंडूने किवी फलंदाजांना बेजार केले. या शिस्तबद्ध गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताने मालिकेत विजयासाठी भक्कम पाया रचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

Goa Politics: 'खरी आरजी कोणती?' यापेक्षा नेते एकत्र राहणार का? अंतर्गत संघर्षाने पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT