MS Dhoni and Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat - Dhoni: विराटचे 'धोनीप्रेम'! 'त्या' स्पेशल पोस्टला 4 तासाच मिळाले 4 लाखांहून जास्त लाईक्स

विराट कोहलीने पुन्हा एकदा एमएस धोनीबद्दलचे प्रेम एक खास पोस्ट शेअर करत व्यक्त केले आहे.

Pranali Kodre

Virat Kohli shares Photo with MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात 8 धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

विराटने सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीबरोबरील सामन्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट आणि धोनी गळाभेट करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटने लाल आणि पिवळ्या रंगाच्या हार्टचे इमोजी बरोबरच भारताचा तिरंगा शेअर केला आहे. याशिवाय विराटने धोनीला टॅगही केले आहे.

विराटने शेअर केलेल्या या पोस्टला इंस्टाग्रामवर केवळ चार तासातच 4 लाख 90 हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. याबरोबरच त्याला ट्वीटरवरही 33 हजारांहून अधिक रिट्वीट आल्या आहेत, तसेच 2 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तसेच विराटच्या या पोस्टवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक चाहत्यांनी 'माहिराट' असेही कमेंट केल्या आहेत.

धोनी आणि विराट हे आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी असले, तरी मैदानाबाहेर त्यांची चांगली मैत्री आहे. त्या दोघांच्या चाहत्यांनी त्यांच्या जोडीला 'माहिराट' हे नावही दिले आहे.

व्हिडिओही झालाय व्हायरल

सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्यावेळी क्रिकेट चाहते नेहमीच एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या भेटीचीही उत्सुकतेने वाट पाहात असतात. सोमवारी झालेल्या सामन्यानंतरही चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.

सामन्यानंतर बराच वेळ धोनी आणि विराट एकमेकांबरोबर गप्पा मारताना दिसले होते. त्यांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या गप्पांदरम्यानचा व्हिडिओही सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सीएसकेने जिंकला सामना

सोमवारी झालेल्या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 226 धावा केल्या होत्या. त्यानंतर 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने अखेरच्या षटकापर्यंत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न अगदी कमी फरकाने अपुरे पडले. आरसीबीला 20 षटकात 8 बाद 218 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT