Virat Kohli X/BCCI
क्रीडा

SA vs IND: एकमेवाद्वितीय! विराटची 76 धावांची खेळी ठरली विश्वविक्रमी, 'हा' कारनामा करणारा एकमेव क्रिकेटर

Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत विराटने एकाकी 76 धावांची झुंझार खेळी केली. या खेळीसह त्याने काही मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, Virat Kohli Record:

दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. सेंच्युरियनला झालेल्या या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात विराट कोहलीने एकाकी झुंज दिली. त्याने 82 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने काही विक्रमांना गवसणी घातली.

विराटने या खेळीदरम्यान 2023 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. विराटने 2023 मध्ये 36 सामन्यांतील 36 डावात 66.06 च्या सरासरीने 8 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2154 धावा केल्या आहेत.

एकमेव खेळाडू

विराटने त्याच्या कारकिर्दीत सातव्यांदा एका वर्षाच 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे असा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी कुमार संगकाराने ६ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 धावा केल्या होत्या.

विराटने 2012, 2014, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2023 या सात वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्वाधिकवेळा एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारे फलंदाज -

7 वेळा - विराट कोहली

6 वेळा - कुमार संगकारा

5 वेळा - सचिन तेंडुलकर

5 वेळा - माहेला जयवर्धने

4 वेळा - जॅक कॅलिस

4 वेळा - रिकी पाँटिंग

4 वेळा - सौरव गांगुली

4 वेळा - मॅथ्यू हेडन

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा

विराटने या अर्धशतकी खेळीसह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

विराटने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 29 सामन्यांत 57.61 च्या सरासरीने 1786 धावा केल्या आहेत. तसेच सचिनने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 38 सामन्यांत 1724 धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक धावा

विराटने या सामन्यात पहिल्या डावातही 38 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या या सामन्यात 114 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे.

विराटने कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 सामन्यांमध्ये 56.25 च्या सरासरीने आणि 3 शतके व 5 अर्धशतकांसह 1350 धावा केल्या आहेत. 

या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विरेंद्र सहेवागने 15 सामन्यांमध्ये 50.23 च्या सरासरीने 1306 धावा केल्या आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावरील द्रविडने 21 कसोटी सामन्यांमध्ये 33.83 च्या सरासरीने 1252 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 25 कसोटी सामन्यांमध्ये 42.46 च्या सरासरीने 1741 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT