Shubman Gill | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Video: कांगारुंविरुद्ध सेंच्यूरी ठोकत गिलनं जिंकलं दिल! पाहा कशी होती किंग कोहलीची रिऍक्शन

शुभमन गिलने अहमदाबाद कसोटीत शतक केल्यानंतर विराट कोहलीही भलताच खूश झाला होता, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

India vs Australia: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्या तिन्ही दिवशी फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भारताकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी केली.

ऑस्ट्रेलिया संघाला 480 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. भारताला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात देताना सलामीला 74 धावांची भागीदारी रचली. पण रोहित 35 धावांवर बाद झाला.

पण त्यानंतर चेतेश्वर पुजाराने गिलला दमदार साथ देत शतकी भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच 62 व्या षटकात गिलने टॉड मर्फीविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत शतकाला गवसणी घातली. त्याने 194 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले.

गिलने हे शतक पूर्ण करताच जोरदार जल्लोष केला. त्याने नेहमीप्रमाणे कंबरेत वाकूनही सेलिब्रेशन केलं. त्याचे हे शतक होताच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही आनंदाचे वातावरण पसरले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही गिलचे शतक पाहून खूपच खूश दिसत होता. या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, गिलने शतक केल्यानंतर 62 व्या षटकातच अखेरच्या चेंडूवर पुजारा पायचीत झाला. त्याने 42 धावा केल्या. त्यामुळे विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. भारताने तिसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपले, तेव्हा पहिल्या डावात 63 षटकात 2 बाद 188 धावा केल्या होत्या.

गिलने वर्षातील पाचवे शतक

शुभमन गिलने अहमदाबाद कसोटीत केलेलं शतक त्याचे 2023 वर्षातील पाचवे शतक आहे. त्याने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये तीन शतके केली आहेत. त्याने वनडेत श्रीलंकेविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन शतके केली. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या द्विशतकाचाही समावेश आहे.

तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही त्याने न्यूझीलंडविरुद्ध यावर्षी शतक केले. त्यानंतर आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतही शतक केले आहे. त्यामुळे 2023 वर्षात 5 शतके करणारा गिल पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

गिलची कारकिर्दीत सात शतके

गिलचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे. तसेच कसोटीमधील दुसरे शतक आहे. त्याने वनडेत आत्तापर्यंत चार शतके केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Image: नवीन ट्रेंड आला! AI वरून 15 रंगांच्या साड्यांमधले फोटो बनवले; गरजेचा, सुरक्षेचा विचार कुणी केला का?

Dashavtar Movie: गोव्यातल्या लोकांनाही आपला वाटेल असा, पर्यावरणाची ‘दशा’ दाखवणारा 'दशावतार'

Parshuram Statue: चोपडे सर्कलवर उभारणार परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा! जीत आरोलकरांना दिली माहिती; जानेवारीपर्यंत करणार काम पूर्ण

Assonora: 'हा तर ग्रामस्थांची घरे व रोजगार हिसकावण्याचा प्रयत्न', अस्नोडातील नोटिसींविरोधात परब आक्रमक; RGPतर्फे आंदोलन

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

SCROLL FOR NEXT