Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'पुढच्या वेळी नक्की...', घाईत असलेल्या विराटचे चाहत्याला प्रॉमिस, पाहा Video

Pranali Kodre

Virat Kohli promise fan for Selfie:

भारतीय क्रिकेटमधील रनमशीन म्हणून विराट कोहलीला ओळखले जाते. तो केवळ भारतातच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याची झलक पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये अनेकदा उत्साहही दिसतो. तसेच तो कधी दिसलाच तर त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरणेही चाहत्यांना कठीण जाते.

अनेकदा विराटही अशा चाहत्यांना नाराज करत नाही. नुकताच असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात विराट एका चाहत्याला सेल्फीचे प्रॉमिस देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की विराट विमानतळावर असून कारमध्ये घाईत बसण्यासाठी जात आहे. पण याचवेळी एक चाहता पळत येऊन त्याला सेल्फीसाठी विचारतो.

यावेळी तो घाईत असल्याने त्या चाहत्याला सेल्फीसाठी पुढच्या वेळी घेण्याची खात्री देतो. व्हिडिओमध्ये दिसते की विराट त्या चाहत्याला सांगत आहे की तो २३ ऑगस्टला याच विमानतळावरून श्रीलंकेला रवाना होणार आहे. त्यावेळी तो सेल्फी देईल.

दरम्यान, 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. याच स्पर्धेसाठी विराट 23 ऑगस्ट रोजी श्रीलंकेला जाणार आहे. यंदाचा आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात खेळवण्यात येणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे.

वनडे स्वरुपात खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच 4 सप्टेंबर रोजी भारताचा नेपाळविरुद्ध सामना होणार आहे.

या स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत भारताचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला असून या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ या देशांचाही समावेश आहे. तसेच बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहे.

भारताचा संघ जाहीर झाला नाही

आशिया चषकाला जरी आता काही दिवसच बाकी असले, तरी भारताला संघ अद्याप जाहीर झालेला नाही. भारतीय निवड समीती येत्या आठवड्यात भारताचा संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह खेळणार का, हे पाहाणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT