Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'तो माझा आवडता खेळाडू...', विराटनं वेस्ट इंडियन फॅन्सचा दिवस बनवला खास, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

Virat Kohli Video: विराट कोहलीने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून चाहत्यांचा दिवस खास बनवला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli pose with fans and sign caps and balls in Dominica: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात पाहायला मिळते. तो सोशल मीडियावरही सर्वाधिक फॉलोवर्स असलेला क्रिकेटपटू आहे. नुकतीच त्याची लोकप्रियतेचा अंदाज वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यानही दिसला आहे.

विराट सध्या भारतीय संघासह वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका 12 जुलै रोजी सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिकाला खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ डॉमिनिकाला पोहचला आहे. यादरम्यान विराटने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून चाहत्यांसाठी वेळ काढला आहे.

विराटने डॉमिनिकामध्ये चाहत्यांबरोबर फोटो काढले असून त्यांनी आणलेल्या कॅप आणि चेंडूंवर स्वाक्षरीही दिली आहे. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चाहता असेही सांगताना दिसत आहे की 'विराट कोहली माझा आवडता फलंदाज आहे. मला त्याची स्वाक्षरीही मिळाली. त्यामुळे मी त्याच्यासाठी कृतज्ञ आहे.'

बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियाही येत आहेत. तसेच या व्हिडिओला मोठ्याप्रमाणात पसंतीही मिळत आहे.

विराटने शेअर केले फोटो

दरम्यान, विराट कोहलीने डॉमिनिकामधील फोटोही शेअर केले आहेत. तसेट त्याने भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबरचाही फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने 2011 मध्ये भारताने डॉमिनिकामध्ये खेळलेल्या कसोटी सामन्याच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

त्यावेळी द्रविड आणि विराट भारतीय संघाकडून एकत्र खेळाडू म्हणून खेळले होते. पण आता विराट खेळाडू म्हणून, तर द्रविड प्रशिक्षक म्हणून डॉमिनिका कसोटीचा भाग असणार आहेत.

कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात

कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेला ऍशेस 2023 मालिकेपासून म्हणजेच 16 जूनपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारत आणि वेस्ट इंडिज संघही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

असा आहे वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

SCROLL FOR NEXT