India T20I Squad for Series Against West Indies: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ घोषित केला आहे. या संघात फार मोठे बदल दिसलेले नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे अनुभवी खेळाडूही गेल्या काही टी20 मालिकांप्रमाणेच या मालिकेतूनही संघातून बाहेर आहेत.
दरम्यान, या संघात तिलक वर्माच्या रुपात एक नवा चेहरा पाहायला मिळाला आहे. खरंतर यंदाच्या आयपीएल 2023 नंतर अनेकांना काही खेळाडू भारताच्या टी20 संघात स्थान मिळवू शकतील अशी अपेक्षा होती.
मात्र, काही खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आल्याचे मत काही क्रिकेट चाहत्यांनी मत व्यक्त केले आहे. यातील अशा 5 खेळाडूंचा आढावा घेऊ, जे टी20 संघात स्थान मिळवू शकत होते.
1. रिंकू सिंग
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला यंदा किमान भारताच्या टी20 संघात स्थान मिळेल, असे अंदाज अनेकांनी व्यक्त केले होते. त्याने या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
त्याने 14 आयपीएल सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या होत्या. इतकेच नाही, तर भारताची देशांतर्गत टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतही त्याने 2022-23 हंगामात 46 च्या सरासरीने 139 धावा केल्या होत्या.
भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक असलेल्या ऋतुराज गायकवाडला वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकांसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. मात्र, त्याला टी२० संघात स्थान मिळालेले नाही. ऋतुराज मर्यादीत षटकांचा एक चांगला खेळाडू समजला जातो.
त्याचबरोबर त्याने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरीही केलेली नाही, अशात त्याला टी२० संघात का संधी दिली गेली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. ऋतुराजने आयपीएल २०२३ स्पर्धेत १६ सामन्यांत 42.14 च्या सरासरीने 590 धावा केल्या.
याशिवाय तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२-२३ स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणारा महाराष्ट्राचा खेळाडू होता. त्याने या हंगामात २ शतकांसह ५९ च्या सरासरीने २९५ धावा केल्या होत्या.
आयपीएल 2023 मध्ये गोलंदाजीत प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये मोहित शर्माचाही समावेश आहे. त्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना महत्त्वाच्या षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी करत सर्वांना चकीत केले होते.
विशेष म्हणजे मोहितला आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्याचा अनुभवही आहे. तो वर्ल्डकप 2015 स्पर्धा भारतासाठी खेळला आहे. असे असताना वेगवान गोलंदाजांच्या फळीत त्याची वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेसाठी निवड केली जाऊ शकली असती.
त्याने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या होत्या, तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता.
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ससाठी दमदार कामगिरी केली होती. दुबेकडे आक्रमक फलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. त्याने हे अनेकदा मुंबईकडून आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दाखवूनही दिले आहे. तसेच तो गोलंदाजीतही त्याचे योगदान देऊ शकतो.
तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही होता. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत 16 सामन्यांत 158 च्या स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या होत्या. यामध्ये ३ अर्धशतकांचाही समावेश होता. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 स्पर्धेतही मुंबईकडून 62 च्या सरासरीने 186 धावा केल्या होत्या.
हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते, त्या वेंकटेश अय्यरलाही पुन्हा भारतीय संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा अनेकांची होती. वेंकटेश अय्यर वरच्या फळीत फलंदाजीत, तसेच गोलंदाजीतही त्याचे चांगले योगदान देऊ शकतो. त्याचा फॉर्मही सध्या चांगला आहे.
त्याने आयपीएल 2023 मध्येही कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याने 14 आयपीएल सामन्यांत एका शतकासह 404 धावा केल्या होत्या. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 स्पर्धेतही चांगला खेळला होता. त्याने 4 सामन्यांत 63 च्या सरासरीने 189 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.