Novak Djokovic - Virat Kohli X/AustralianOpen and BCCI
क्रीडा

Virat Kohli Video: '...अन् जोकोविचचा मेसेज पाहून वाटलं फेक अकाऊंटच आहे', विराटने सांगितलं नक्की काय झालेलं

Novak Djokovic: जेव्हा विराटने जोकोविचला इंस्टाग्राम मेजेस केला, तेव्हा काय झालं? BCCI च्या व्हिडिओमध्ये केला खुलासा

Pranali Kodre

Virat Kohli opens up about texting Novak Djokovic and their bond with each other:

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि सार्बियाचा स्टार टेनिसपटू जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात एक नवी उंची गाठली असून वेगळी ओळख मिळवली आहे. दरम्यान, दोघेही वेगवेगळे खेळ खेळत असले आणि अद्याप एकत्र भेटले नसले तरी एकमेकांशी संपर्क साधत असतात, याबद्दल नुकताच दोघांनी खुलासा केला आहे.

सोनी स्पोर्ट्सशी बोलताना जोकोविच म्हणाला होता, 'विराट कोहली आणि मी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना मेसेज करतो. आम्हाला एकमेकांना अजून प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेली नाही. पण माझ्याबद्दल त्याच्याकडून चांगले ऐकायला मिळणे हा माझा सन्मान आहे आणि नक्कीच मी त्याच्या कारकिर्दीत त्याने जे मिळवले आहे, त्याबद्दल कौतुक करतो.'

यानंतर आता जोकोविचला मेसेज करण्याबद्दल विराटनेही बीसीसीआयशी बोलताना खुलासा केला आहे. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

विराटने व्हिडिओमध्ये सांगितले की 'मी नोवाकशी नैसर्गिकरित्या जोडलो गेलो. मला वाटतं मी एकदा इंस्टाग्रामवर त्याचे प्रोफाईल पाहात होतो आणि मी सहज मेसेजचं बटण दाबलं, मला वाटतं मी हॅलो वैगरे म्हटलो असेल. नंतर माझ्या डीएमवर त्याचा मेसेज आला होता.'

'मी कधी स्वत:हून कधी मेसेज उघडत नाही. पण तेव्हा मला एकाक्षणी वाटलं की कदाचीत खोटं अकाऊंट वैगरे असेल, म्हणून मी पुन्हा तपासलं. पण ते खरं होतं. त्यानंतर आम्ही बोलायला लागलो. आम्ही आता बऱ्याचदा मेसेज करत असतो. मी त्याला त्याच्या सर्व यशासाठी अभिनंदन केले आहे.'

विराटने काही दिवसांपूर्वीच 50 वे वनडे शतक केले होते, त्यावेळीही जोकोविचने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे कौतुक केले होते.

याबद्दलही विराटने सांगितले. विराट म्हणाला, 'जेव्हा मी ५० वे वनडे शतक केले होते, तेव्हा मला वाटतं त्याने स्टोरी ठेवली होती आणि त्याने मला एक छान मेसेजही पाछवला होता. त्यामुळे आमच्यात एकमेकांबद्दल आदर आणि कौतुक आहे. उच्च स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंशी संपर्क करणे खरंच मस्त आहे'

विराट पुढे म्हणाला, 'मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल मला खूप आदर आहे. त्याची फिटनेससाठीची जिद्द इतकी आहे की मीही ती फॉलो करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला जोडणाऱ्या अशा खूप गोष्टी आहेत.'

'आशा आहे की तो लवकर भारतात येईल किंवा मी तो ज्या देशात खेळत असेल, तिथे जाईल. आम्ही नक्कीच भेटू आणि कदाची एखादा कप कॉफी वैगरे घेऊ.'

याशिवाय विराटने जोकोविचला 14 जानेवारीपासून चालू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. जोकोविच यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विश्वविक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या हेतूने उतरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT