Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli: विराटची 49 वनडे शतकाची संधी थोडक्यात हुकली, पण वानखेडेवर रचले मोठे विक्रम

India vs Sri Lanka World Cup: विराट कोहलीची वानखेडे स्टेडियमवर 49 वे वनडे शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी थोडक्यात हुकली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka, Virat Kohli Record:

भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (2 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अर्धशतक करत मोठे विक्रम केले आहेत.

विराटने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. हे त्याचे 70 वे वनडे शतक ठरले. मात्र त्याचे वनडे क्रिकेटमधील 49 वे शतक करण्याची संधी अगदी थोडक्यात 12 धावांनी हुकली.

जर विराटने 49 वनडे शतक पूर्ण केले असते, तर त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक 49 शतकांची बरोबरी केली असती. विशेष म्हणजे सचिन मैदानावर सामना पाहण्यासाठी उपस्थित असताना त्याला ही संधी होती. मात्र, त्याची ही संधी थोडक्यात हुकली.

विराटची ही संधी हुकली असली तरी विराटने काही विक्रम केले आहेत. विराटने वनडे वर्ल्डकपमध्ये ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही १३ वी वेळ होती.

त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 21 वेळा वनडेत 50 धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत) -

    • 21 वेळा - सचिन तेंडुलकर (44 डाव)

    • 13 वेळा - विराट कोहली (33 डाव)

    • 12 वेळा - रोहित शर्मा (24 डाव)

    • 12 वेळा - शाकिब अल हसन (35 डाव)

    • 12 वेळा - कुमार संगकारा (35 डाव)

    • 11 वेळा - रिकी पाँटिंग (42 डाव)

विराटच्या आठव्यांदा 1000 धावा

विराटने या खेळीदरम्यान 2023 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात वनडेत 1000 धावा पूर्ण करण्याची ही आठवी वेळ ठरली.

त्यामुळे तो 8 वेळा एका वर्षात 1000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याबाबत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने 7 वेळा वनडेत एका वर्षात 1000 धावांचा टप्पा पार केला होता.

विराटने 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2023 असे आठ वर्षी वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

इंझमामला टाकले मागे

विराटने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पूर्ण केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध आता 72 सामन्यात 4018 धावा झाल्या आहेत. तो श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

सचिनने श्रीलंकेविरुद्ध 109 सामन्यात 5108 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इंझमाम-उल-हक आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 83 सामन्यात 3824 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT