Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

मोहालीत विराटचा जलवा, कसोटीतील 8000 धावांचा टप्पा केला पूर्ण

मोहालीमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्यांदा 100 कसोटी पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने कसोटीतील 8000 धावा पूर्ण केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

विराट कोहली (Virat Kohli 8000 runs) जेव्हा मैदानात येतो तेव्हा विक्रम मोडले जातात, असेच काहीसे मोहालीमधील श्रीलंकेविरुध्दच्या कसोटीत घडले. मोहालीमध्ये विराटने (Virat Kohli) पहिल्यांदा 100 वा कसोटी सामना पूर्ण केला. त्यानंतर त्याने कसोटीतील 8000 धावा पूर्ण केल्या. कसोटीमध्ये 8000 धावा करणारा विराट कोहली हा सहावा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी हा पराक्रम केला आहे. (Virat Kohli Is The Sixth Indian To Score 8000 Runs)

दरम्यान, विराट कोहलीने 169 डावांमध्ये 8000 कसोटी धावांचा आकडा गाठला आहे. सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वात जलद 8000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्यानंतर राहुल द्रविडने 157 तर सेहवागने 160 डावात ही कामगिरी केली होती. गावस्कर यांनी 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 166 डाव लागले. 100 व्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. रिकी पाँटिंगनेही आपल्या 100 व्या कसोटीत 8000 धावांचा टप्पा पार केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने दोन्ही डावात शतकेही ठोकली होती. मात्र, विराट आपल्या 100 व्या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावांवर बाद झाला.

शिवाय, विराट कोहलीने 100 व्या कसोटीत कसोटी क्रिकेटमधील 900 चौकारही पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो सध्याच्या खेळाडूंमध्ये दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. जो रुटच्या नावावर 1000 पेक्षा जास्त चौकार आहेत. तर सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे, ज्याच्या नावावर 2000 पेक्षा जास्त चौकार आहेत. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हा दुसरा खेळाडू आहे, ज्याने 8000 कसोटी धावांचा आकडा गाठला आहे. जो रुट 9600 धावांसह आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT