Virat Kohli 97 meter six Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Video: एकच नंबर! विराटने ठोकला 'माही शॉट', पाहा 97 मीटरचा जबरदस्त षटकार

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने 317 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही 3-0 अशी जिंकली. भारताच्या या विजयात विराट कोहलीचे योगदान महत्त्वाचे राहिले.

विराटने या सामन्यात दीडशतकी खेळी करताना चौकार-षटकारांचाही पाऊस पाडला. या खेळीदरम्यान त्याने एक 97 मीटरचा षटकार मारला होता. त्याच्या या षटकाराची बरीच चर्चा होत आहे. कारण त्याने हा षटकार मारताना माजी कर्णधार एमएस धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळला.

विराटने या सामन्यात त्याचे शतक 85 चेंडूतच पूर्ण केले होते. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने तब्बल 7 षटकार ठोकले. त्याने 100 ते 150 धावांपर्यंत पोहोचायला केवळ 21 चेंडू घेतले. त्याने शतक केल्यानंतर 44 व्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज कसून रजिताने टाकलेल्या स्लोअर बॉलवर हेलिकॉप्टर शॉट खेळत लाँग-ऑनच्या स्टँडमध्ये चेंडू पाठवला.

त्याचा हा षटकार जळपास 97 मीटर पार करून गेला. हा शॉट मारल्यानंतर विराटही खूश दिसला. तसेच तो शॉट खेळल्यानंतर खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या श्रेयस अय्यरलाही भेटला. यावेळी तो श्रेयसला काहीतरी म्हणाला. पण तो त्यावेळी त्याच्या शॉटचे वर्णन माही शॉट असे करताना दिसतोय, असा कयास अनेक चाहत्यांनी लावला.

(Virat Kohli hit Dhoni-like helicopter shot for 97meter six)

दरम्यान, विराटने या सामन्यात 110 चेंडूत नाबाद 166 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एकूण 13 चौकार आणि 8 षटकार मारले. विराटची वनडेमध्ये 150 धावांचा टप्पा पार करण्याची ही पाचवी वेळ होती. तसेच हे त्याचे मायदेशातील 21 वे वनडे शतक होते. त्यामुळे तो मायदेशात सर्वाधिक वनडे शतके करणाराही फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात विराटव्यतिरिक्त शुभमन गिलने देखील शतकी खेळी करताना 97 चेंडूत 116 धावांची खेळी केली. तसेच रोहित शर्माने 42 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या होत्या. त्यानंतर 391 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 22 षटकात 73 धावांवरच सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT