IND vs SL: किंग कोहलीचा श्रीलंकेला पुन्हा शतकी तडाखा! नावावर केले 3 'विराट' वर्ल्ड रेकॉर्ड्स

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शतकी खेळी करत मोठमोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Virat Kohli Playing India vs Sri Lanka ODI
Virat Kohli Playing India vs Sri Lanka ODIDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli: भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियवर झाला. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे.

त्याने 85 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. हे विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 74 वे शतक आहे, तर वनडे क्रिकेटमधील 46 वे शतक आहे. विराटने याच मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील शतकी खेळी केली होती.

(Virat Kohli scored 74th Hundred during 3rd ODI against Sri Lanka)

Virat Kohli Playing India vs Sri Lanka ODI
India vs Sri Lanka: टीम इंडियाला मिळाला खूंखार गोलंदाज, जस्सीच्या करिअरला मोठा धोका!

विराटचे श्रीलंकेविरुद्ध 10 वे शतक

विराटचे हे श्रीलंकेविरुद्धचे 10 वे वनडे शतक आहे. त्यामुळे एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट स्वत:चाच विक्रम मोडत अव्वल स्थानी आला आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्वत: विराट आणि सचिन तेंडुलकर संयुक्तरित्या आहेत. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध 9 वनडे शतके केली आहेत, तर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतके केली आहेत. तसेच विराट एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध वनडेत 10 शतके करणाराही जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे.

वनडेत एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

10 शतके - विराट कोहली विरुद्ध श्रीलंका

9 शतके - विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज

9 शतके - सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया

8 शतके - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया

8 शतके - विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया

8 शतके - सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका

Virat Kohli Playing India vs Sri Lanka ODI
India vs New Zealand: टी20 मालिकेसाठी किवी संघ जाहीर, विलियम्सनऐवजी 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची धूरा

विराटचा मायदेशात शतकांचा रतीब

त्याचबरोबर मायदेशात सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट सचिनला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत रविवारी विराटने केलेले मायदेशातील 21 वे वनडे शतक होते. सचिनने मायदेशात 20 वनडे शतके केली आहेत.

वनडेत मायदेशात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

21 शतके - विराट कोहली (भारत)

20 शतके - सचिन तेंडुलकर (भारत)

14 शतके - हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)

13 शतके - रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)

12 शतके - रॉस टेलर (न्यूझीलंड)

Virat Kohli Playing India vs Sri Lanka ODI
India vs Sri Lanka: हवेत सूर मारत अक्षर पटेलने घेतला अप्रतिम कॅच, पाहा Video

सचिनपेक्षा कमी डावात 46 शतके

वनडेमध्ये 46 शतके विराट व्यतिरिक्त केवळ सचिन तेंडुलकरने केली आहेत. सचिनने 49 वनडे शतके केली आहेत. दरम्यान सचिनपेक्षा तब्बल 172 डाव कमी खेळत विराटने 46 वनडे शतके केली आहेत. विराटने 259 वनडे डावात 46 व्या शतकाला गवसणी घातली, तर सचिनने 431 डावात 46 वे वनडे शतक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com