Virat Kohli Golden Duck Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Virat Kohli Golden Duck IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीची बॅट १० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पूर्णपणे शांत राहिली.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीची बॅट १० मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पूर्णपणे शांत राहिली. या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला (गोल्डन डक). विशेष म्हणजे, याआधी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातही कोहली पहिल्याच चेंडूवर माघारी परतला होता. एकाच हंगामात सलग दोन सामन्यात 'गोल्डन डक'वर बाद होण्याची ही विराटची दुसरी वेळ असून, यापूर्वी २०२२ मध्येही त्याच्यासोबत असाच प्रकार घडला होता.

२०२२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती

२०२२ चा आयपीएल हंगाम विराट कोहलीसाठी धावांच्या दृष्टीने अत्यंत कठीण ठरला होता. त्यावर्षी १९ एप्रिल रोजी लखनऊ विरुद्ध दुश्मंता चमीराच्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर लगेचच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मार्को यान्सनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. त्या संपूर्ण हंगामात विराटने १६ सामन्यांत केवळ २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या होत्या.

यंदाचा हंगाम आणि कोहलीची कामगिरी

४ वर्षांनंतर पुन्हा एकदा कोहलीने हा 'लाजिरवाणा' विक्रम आपल्या नावावर केला आहे. यंदा लखनऊ विरुद्ध तो प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर मुंबई विरुद्ध दीपक चहरने त्याला बाद केले. मात्र, २०२२ च्या तुलनेत यंदा कोहलीचा फॉर्म उत्तम दिसत आहे.

त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत ४२.११ च्या सरासरीने ३७९ धावा फटकावल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यंदा त्याने ४२ चौकार आणि १५ षटकार मारून आपली आक्रमकता सिद्ध केली असली, तरी सलग दोन 'गोल्डन डक'ने चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT