India vs Pakistan | Babar Azam - Virat Kohli ICC
क्रीडा

IND vs PAK सामन्यानंतर विराट-बाबरमध्ये दिसला भाईचारा! जर्सी भेट देतानाचा व्हिडिओ व्हायरल

World Cup 2023: शनिवारी वर्ल्डकप २०२३ मध्ये भारत - पाकिस्तान सामना पार पडला, या सामन्यानंतर विराट कोहली बाबर आझमला जर्सी भेट देताना दिसला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Virat Kohli -Babar Azam:

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच रोमांचक होतो. या सामन्याची चाहतेही आतुरतेने वाट पाहात असतात. त्यामुळे या सामन्यात नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. शनिवारीही वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यात अनेक खास गोष्टी पाहायला मिळाल्या.

हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. तसेच हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 3.5 कोटी युजर्सने एकाचवेळी पाहिला. 

दरम्यान, याच सामन्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचेही दर्शन झाले. या सामन्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकत्र एकमेकांशी चर्चा करताना दिसले होते.

यावेळी बाबरने विराटला जर्सी देण्याबद्दल विचारले, त्यानंतर विराटनेही मोठ्या मनाने त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी करत भेट दिली. त्यांचा व्हिडिओही आयसीसीने शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी 30 षटकांच्या आतच 150 धावांचा टप्पाही पार केला होता.

मात्र, 30 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाबर आझमला 50 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र, पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानने बाबर बाद झाल्यानंतर अखेरच्या 7 विकेट्स फक्त 36 धावांत गमावल्या. त्यामुळे पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला. बाबर व्यतिरिक्त मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शुभमन गिलची (16) विकेट लवकर गमावली. पण नंतर रोहित शर्माने आधी विराट कोहलीबरोबर(16) 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरबरोबर 77 धावांची भागीदारी करत भारतासाठी विजय सोपा केला.

रोहितने 86 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने केएल राहुलला (19*) साथीला घेत विजय मिळवून दिला. श्रेयसने 53 धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT