Virat Kohli | IND vs BAN Test Match | Virat Kohli Gift to Mehidy Hasan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: किंग कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियाच्या 'शत्रू'ला दिले खास गिफ्ट

Virat Kohli Gift to Mehidy Hasan: ढाका येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Gift to Mehidy Hasan: ढाका येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. भारताला 145 धावांचे लक्ष्य मिळाले असेल, पण यासाठी त्यांना 7 विकेट्स गमवाव्या लागल्या. दरम्यान, विराट कोहलीने विरोधी संघाच्या खेळाडूला खास भेट दिली आहे.

अय्यर आणि अश्विन चमकले

शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांत गुंडाळला. यानंतर भारताने पहिल्या डावात 314 धावा केल्या. यजमानांनी दुसऱ्या डावात 231 धावा केल्याने भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य होते. रविचंद्रन अश्विन (42*) आणि श्रेयस अय्यर (29*) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर भारताने 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. अश्विनने 62 चेंडूत नाबाद 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याचवेळी अक्षर पटेलने 34 धावांचे योगदान दिले.

विराटने भेट दिली

सामन्यानंतर विराटने बांगलादेशच्या (Bangladesh) मेहदी हसन मिराजला खास भेट दिली. मेहदीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो विराटकडून जर्सी घेताना दिसत आहे. विराटने आपला ऑटोग्राफ केलेला टी-शर्ट मिराजला भेट दिला आहे. मेहदी हसनने या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या 5 विकेट घेतल्या होत्या. अश्विन आणि श्रेयस यांची भागीदारी झाली नसती तर मेहदीने आपल्या संघाला जिंकून दिले असते.

मेहदीने टीम इंडियाला अडचणीत आणले

ढाका येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने भारताला (India) सर्वाधिक त्रास दिला. फलंदाजीत तो विशेष काही करु शकला नाही, परंतु गोलंदाजीत त्याने आपली ताकद दाखवून दिली. त्याने 19 षटकात 63 धावा देत 5 बळी घेतले. यादरम्यान मेहदीने शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत या स्टार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने अक्षर पटेललाही शिकार बनवले. मेहदीने वनडे मालिकेतही अप्रतिम कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft: एक-दोन नव्हे तर 7 चोरीच्या गाड्या जप्त! सराईत वाहन चोरट्याला ठोकल्या बेड्या, साळगाव पोलिसांचा 'स्ट्राँग' गेम

Viral Video: कॅफे आहे की डान्स फ्लोअर? टिप मिळताच वेटर्स धरतात ठेका, ग्राहकांच्या पसंतीस उतरतोय 'हा' खास अंदाज; नेटकरी फिदा

Pakistan Suicide Attack: पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला! सुसाईड बॉम्बरनं स्वतःला उडवलं; 31 ठार, अनेक जखमी VIDEO

T20 World Cup 2026: टीम इंडियाला मोठा झटका! हर्षित राणा टी-20 विश्वचषकातून बाहेर; 'या' खेळाडूची लागली लॉटरी

Budh Shukra Yuti 2026: प्रेम, पैसा आणि प्रतिष्ठा..! बुधाची बुद्धी अन् शुक्राची माया करणार मालामाल; 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट

SCROLL FOR NEXT