Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: किंग कोहली @500! वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताच होणार सचिन-धोनीच्या पंक्तीत सामील

Pranali Kodre

Virat Kohli 500 International Cricket Matches: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून (20 जुलै) कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. दरम्यान, हा सामना वैयक्तिकरित्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खूप खास असणार आहे.

विराट कोहली घालणार नव्या विक्रमाला गवसणी

विराटसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा दुसरा कसोटी सामना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 वा सामना असणार आहे. त्यामुळे तो 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील केवळ 10 वा खेळाडू ठरणार आहे. तसेच भारताचा केवळ चौथा फलंदाज ठरणार आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि राहुल द्रविड या तीनच भारतीय क्रिकेटपटूंना असा कारनामा करता आला आहे. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 664 सामने खेळले आहेत. तसेच धोनीने 538 सामने आणि द्रविडने 509 सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू

  • 664 सामने - सचिन तेंडुलकर (भारत)

  • 652 सामने - माहेला जयवर्धने (श्रीलंका)

  • 594 सामने - कुमार संगकारा (श्रीलंका)

  • 586 सामने - सनथ जयसूर्या (श्रीलंका)

  • 560 सामने - रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)

  • 538 सामने - एमएस धोनी (भारत)

  • 524 सामने - शाहिद आफ्रिदी (पाकस्तान)

  • 519 सामने- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

  • 509 सामने - राहुल द्रविड (भारत)

  • 499 सामने - इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)

  • 499 सामने - विराट कोहली (भारत)*

विराटचे आंतरराष्ट्रीय सामने

साल 2008 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने भारताच्या राष्ट्रीय संघात श्रीलंकाविरुद्ध डंबुला येथे 18 ऑगस्ट 2008 रोजी झालेल्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याने 2010 मध्ये त्याने 12 जून रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारेमध्ये झालेल्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटीत त्याचे पदार्पण 2011 मध्ये किंगस्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून 20 जून रोजी झाले.

विराटने गेल्या 15 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप सोडली आहे. त्याने खेळाडू म्हणून त्याची कारकिर्द मोठी घडवताना भारतीय संघाचे नेतृत्वही केले. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही झाला.

विराटने आत्तापर्यंत खेळलेल्या 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 110 कसोटी, 274 वनडे आणि 115 टी20 सामन्यांचा समावेश आहे. त्याने 499 सामन्यांमध्ये 53.48 च्या सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 75 शतकांचा समावेश आहे. तो 75 आंतरराष्ट्रीय शतके करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT