Virat Kohli: किंग कोहलीची लाईव्ह सामन्यात मस्ती! भर मैदानातच धरला ठेका; Video तुफान व्हायरल

India vs West Indies: विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli dance during 1st Test West Indies vs India in Dominica: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात डॉमिनिकाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याचा मैदानात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरण्यावेळी विराट मैदानावर आधीच आलेला होता.

त्यावेळी विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये होता. तो यावेळी काही डान्स स्टेप्सही करत होता. त्याच्यासमोर यशस्वी जयस्वालही उभा होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli
R Ashwin Records: अश्विनची मोठी झेप! विंडिजविरुद्ध 12 विकेट्स घेत भल्याभल्या दिग्गजांना टाकलं मागे

दरम्यान, यापूर्वी याच सामन्यात मैदानावर ठेका धरताना शुभमन गिलचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना गिल डान्स स्टेप्स करताना दिसला होता.

भारताचा विजय

या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही.

भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली.

Virat Kohli
IND vs WI, 1st Test: टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी डावाने दणक्यात विजय! अश्विनच्या फिरकीने उडवला वेस्ट इंडिजचा धुव्वा

त्यानंतर भारताने पहिला डाव 152.2 षटकानंतर 5 बाद 421 धावांवर भारताचा डाव घोषित केला. भारताकडून या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 171 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली.

याशिवाय विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून केमार रोच, अल्झारी जोसेफ, राहकिम कॉर्नवॉल आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 50.3 षटकात 130 धावांवरच संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून एलिक अथनाझने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. तसेच जेसन होल्डरने 20 धावांची खेळी केली. अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने शानदार गोलंदाजी करताना 21.3 षटकात 71 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com