Virat Kohli BCCI
क्रीडा

Virat Kohli: 'रनमशीन' कोहली सुसाट! फिफ्टी ठोकत सचिनच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी

India vs Netherlands World Cup: वर्ल्डकप 2023 मध्ये विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक करत सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Virat Kohli Fifty Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना होत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटने 56 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावांची खेळी केली. त्यामुळे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 9 सामन्यांमधील ही त्याची 50 धावांचा टप्पा पार करण्याची सातवी वेळ होती. त्याने दोन शतके आणि 5 अर्धशतके केली.

त्यामुळे विराट एकाच वर्ल्डकपमध्ये 7 वेळा 50 धावांचा टप्पा पार करणारा तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि शाकिब अल हसनची बरोबरी केली आहे. सचिन आणि शाकिब यांनीही असा कारनामा केला आहे. सचिनने 2003 वर्ल्डकपमध्ये आणि शाकिबने 2019 वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 7 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे.

विराटने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्याविरुद्ध अर्धशतके ठोकली, तर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली.

इतकेच नाही, तर विराटने वनडे वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत खेळताना 15 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 21 वेळा वनडेत 50 धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 11 नोव्हेंबर 2023 पर्यंत) -

    • 21 वेळा - सचिन तेंडुलकर (44 डाव)

    • 15 वेळा - विराट कोहली (35 डाव)

    • 13 वेळा - रोहित शर्मा (26 डाव)

    • 13 वेळा - शाकिब अल हसन (36 डाव)

    • 12 वेळा - कुमार संगकारा (35 डाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT