Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

कोहलीने सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला नाही अन्...

बीसीसीआयने (BCCI) 8 डिसेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टी-20 सोबत एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल.

दैनिक गोमन्तक

विराट कोहली (Virat Kohli) आता भारतीय कसोटी संघाचा (Indian Test Team) एकमेव कर्णधार आहे. त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) 8 डिसेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टी-20 सोबत एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल. बीसीसीआयने कोहलीने स्वत: पद सोडले की काढून टाकले याची माहिती दिलेली नाही. परंतु ज्या पद्धतीने रोहितला कर्णधार बनण्याची माहिती देण्यात आली, त्यावरुन कोहलीला हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विराटने काही महिन्यांपूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. रोहित वनडेतही कर्णधार होईल, असे तेव्हा मानले जात होते. आता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यापूर्वी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोहलीला कर्णधारपद सोडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. परंतु जेव्हा तसे झाले नाही तेव्हा बीसीसीआयनेच पुढे जाऊन रोहितला वनडेचे प्रमुख केले. कोहलीचा कर्णधारपदाचा काळ हा एका शानदार कथेसारखा आहे. महेंद्रसिंग धोनीने कोहलीला आपल्या नेतृत्वाखाली तयार केले आणि नंतर जेव्हा त्याला आपली वेळ आली असे वाटले तेव्हा त्याने पांढऱ्या चेंडूची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आले. पुढच्या दोन वर्षात कोहली संघाचा पराक्रमी कर्णधार बनला जो स्वतःच्या मर्जीनुसार गोष्टी करु लागला.

तसेच, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रशासकांची समिती स्थापन केली, जी खेळाडूंच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करते. त्यानंतर पारंपारिक प्रशासकांचे पुनरागमन झाले, ज्यात अत्यंत शक्तिशाली सचिव आणि अध्यक्ष होते ज्यांना स्वतःला यशस्वी कर्णधारपदाची माहिती आहे.

विराट खेळाडूंशी बोलत नाही!

भारतीय क्रिकेट जवळून पाहणाऱ्यांना या घटनेचे आश्चर्य वाटू नये. ड्रेसिंग रुममध्ये कोहली हा सर्वात प्रसिद्ध व्यक्ती नव्हता हे कोणापासून लपून राहिलेले नाही. दोन वर्षांपूर्वीपर्यंत टीम इंडियाचा भाग असलेल्या एका खेळाडूने पीटीआयला सांगितले की, 'विराटची सर्वात मोठी समस्या ही आहे की, तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. तो स्पष्टपणे सांगतो पण समस्या अशी आहे की, तो संवाद अजिबात ठेवत नाही.

कोहलीला कुलदीप यादवला सांभाळता आले नाही

माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्ये कोहलीने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला होता. परंतु प्रशिक्षक असताना त्याने कोहलीला मॅनेजमेंट स्किल्सवर काम करायला सांगितलं का? कदाचित नाही कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधते? अनिल कुंबळेने प्रयत्न केला होता आणि तो सपशेल अपयशी ठरला. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात एक-दोन अपयशानंतरच खेळाडूंनी असुरक्षितता व्यक्त केली आहे. कुलदीप यादवचे प्रकरण हे कोहलीच्या नेतृत्व क्षमतेचे सर्वात वाईट उदाहरण आहे. कुलदीपसारखा प्रतिभावान खेळाडू आज संघात नाही. केवळ कुलदीपच नाही तर असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संघातील त्यांची भूमिकाही माहीत नव्हती.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोहलीला जेव्हा कर्णधारपद मिळाले तेव्हा तो सर्वात वेगळा झाला होता. अनेक वर्षांपासून ज्युनियर खेळाडूंना रोहितच्या रुपाने मोठा भाऊ मिळाला, जो त्याच्या खांद्यावर हात ठेवून आत्मविश्वास देत असे. तो त्यांना बाहेर जेवायला घेऊन जायचा आणि बरे नसताना त्यांच्याशी बोलायचा. आता कोहली हा फक्त कसोटी कर्णधार आहे. तो आता संघाचा निर्विवाद प्रमुख नाही. या बदललेल्या परिस्थितीत ते स्वतःला कसे सामावून घेतात हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT