विराटनं सोडलं T-20 चं कर्णधारपद, अनुष्काने दिली अशी प्रतिक्रिया...

विराटची (Virat Kohli) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) शर्मा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
Anushka Sharma's reaction on Virat Kohli T-20 captaincy decision
Anushka Sharma's reaction on Virat Kohli T-20 captaincy decision Dainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाचा (Team Indian Captain) कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) शुक्रवारी अचानक T-20 संघाचे कर्णधारपद (Captaincy) सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. विराटने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना याची जाणीव करून दिली. अशा परिस्थितीत विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) शर्मा हिने देखील तिच्या पतीच्या या निर्णयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.(Anushka Sharma's reaction on Virat Kohali's T-20 captaincy decision)

Anushka Sharma
Anushka SharmaDainik Gomantak

अनुष्का शर्मा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते . अशा परिस्थितीत, पती विराट कोहलीने T-20 मधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने विराटचे पत्र इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करून आणि त्यावर लव्ह अशी हार्टची इमोजी बनवून त्याच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.

त्याचबरोबर विराटच्या या निर्णयावर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलेब्सनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. तनुज विरवानी यांनी लिहिले - हा एक चांगला निर्णय आहे, आम्हाला फलंदाज विराट कोहलीला अधिकाधिक भरभराटीत पाहायचे आहे गायक टोनी कक्कडने प्रेमाचे इमोजी बनवून निर्णयाचे स्वागत केले आहे.

Anushka Sharma's reaction on Virat Kohli T-20 captaincy decision
शाहरुख खानच्या अडचणीत वाढ, #BoycottShahRukhKhan होतोय ट्रेंड

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, अनुष्का शर्मा आणि विराट 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनीही इटलीमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सात फेऱ्या घेतल्या. यावर्षी 11 जानेवारी रोजी अनुष्का शर्माने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव वामिका ठेवले आहे. अनुष्का बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर दिसत आहे. आता ती निर्माता म्हणून काम करताना दिसली आहे. गेल्या वर्षी अनुष्काने पाताल लोक अमेझॉन ही वेब सीरिज तयार केली होती, बुलबुलची निर्मिती अनुष्काने केली होती.तिच्या या दोन्ही प्रयोगांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

विराट कोहलीने आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की कसोटी संघ आणि भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी वेळ देण्यासाठी त्याला आता स्वतःसाठी जागा हवी आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीने लिहिले की, ऑक्टोबरमध्ये दुबईत होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर तो T-20 संघाचे कर्णधारपद सोडेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com