Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: जबरदस्त! किंग कोहलीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली मोठी कामगिरी

Virat Kohli, Most International Runs: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील सर्वात मोठ्या दिग्गजांमध्ये विराट कोहलीची गणना होते.

Manish Jadhav

Virat Kohli, Most International Runs: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील सर्वात मोठ्या दिग्गजांमध्ये विराट कोहलीची गणना होते. जेव्हा तो मैदानात येतो तेव्हा नवा विक्रम त्याची वाट पाहत असतो.

विश्वचषक 2023 च्या चौथ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध असेच काहीसे घडले. विराट कोहलीने या विश्वचषकात तिसरे अर्धशतक झळकावले आणि शानदार विक्रम केला. 67 धावा केल्यानंतर त्याने 26 हजार आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या.

विराटने ते केले जे कोणी केले नाही...

आता तो जगातील चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. याशिवाय विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस स्कोअर करणारा चौथा फलंदाज ठरला.

एवढेच नाही तर या इनिंगमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 1000 धावाही पूर्ण केल्या. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

तसेच, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी, एकदिवसीय विश्वचषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना 1500 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. या डावात कोहलीने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील 9वे अर्धशतकही झळकावले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 5 फलंदाज

सचिन तेंडुलकर- 34357

कुमार संगकारा- 28016

रिकी पाँटिंग- 27483

विराट कोहली- 26000

महेला जयवर्धने- 25957

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक पन्नास प्लस स्कोअर

सचिन तेंडुलकर- 264

रिकी पाँटिंग- 217

कुमार संगकारा- 216

विराट कोहली- 212

जॅक कॅलिस- 211

दुसरीकडे, यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढले आणि 116 चेंडूत 85 धावा केल्या.

अफगाणिस्तानविरुद्धही त्याने नाबाद 55 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) तो केवळ 16 धावा करुन बाद झाला. पण आज पुन्हा त्याने अर्धशतक ठोकून चमत्कार मोठा कारनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT