Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाब किंग्ज विरुद्ध विराटने केला मोठा रेकॉर्ड, IPL चा ठरला 'किंग'

Virat Kohli IPL Records: आयपीएल 2023 चा 27 वा सामना गुरुवारी (20 एप्रिल) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

Virat Kohli IPL Records: आयपीएल 2023 चा 27 वा सामना गुरुवारी (20 एप्रिल) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला.

या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

बंगळुरुकडून सलामीला आलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने चांगली फलंदाजी केली. दोघांनी शानदार अर्धशतकी खेळी खेळली. यादरम्यान विराटने एक नाही तर 2-2 विक्रम आपल्या नावावर केले.

विराट पहिला फलंदाज ठरला

या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 30 धावा केल्याबरोबर, 100 वेळा 30 पेक्षा जास्त धावा करणारा तो आयपीएल इतिहासातील एकमेव फलंदाज ठरला.

त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 47 वेळा 5 शतके, 48 अर्धशतके आणि 30 धावा केल्या आहेत. एकूणच, विराटने आता 100 वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत शिखर धवनचा नंबर लागतो, ज्याने 91 वेळा ही कामगिरी केली आहे.

विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत 228 षटकारही मारले आहेत

पंजाब किंग्जविरुद्ध फलंदाजी करताना विराटने 47 चेंडूत 59 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 चौकारांचा समावेश होता.

आयपीएलमध्ये (IPL) त्याच्या नावावर 600 चौकार आहेत. त्याच्या नावावर आता आयपीएलचे 602 चौकार झाले आहेत. याशिवाय, विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत 228 षटकारही मारले आहेत.

या मोसमातील चौथे अर्धशतक

विराट कोहलीसाठी आतापर्यंतचा हा आयपीएल हंगाम शानदार राहिला आहे. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल 2023 मधील चौथे अर्धशतक ठोकले.

विराटने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 141.94 च्या स्ट्राईक रेटने 264 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 होती. विराटने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT