Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli: फक्त विराटच नाही, तर 'या' 7 खेळाडूंनी बर्थडेला ठोकली ODI सेंच्युरी! तीन भारतीयांचा समावेश

Virat Kohli Birthday Century: विराट कोहलीने वर्ल्डकप 2023 मध्ये 35 व्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa, Virat Kohli Century on 35th Birthday:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना झाला. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात विराट कोहलीनेही शतकी खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले.

विशेष म्हणजे रविवारी विराट 35 वा वाढदिवस साजरा करत होता. त्यामुळे वाढदिवशीच त्याने स्वत:ला, भारतीय संघाला आणि चाहत्यांना वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला.

विराटने या सामन्यात 121 चेंडूत 10 चौकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक आहे. त्यामुळे विराट वाढदिवशी वनडे सामन्यात शतक करणारा एकूण सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक करणारा केवळ तिसराच क्रिकेटपटू आहे.

यापूर्वी विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांनी वाढदिवशी वनडेत शतक करण्याचा कारनामा केला आहे. तसेच यातील रॉस टेलर आणि मिचेल मार्श यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक करण्याचा पराक्रम केला आहे.

न्यूझीलंडच्या रॉस टेलरने 2011 वर्ल्डकपमध्ये 8 मार्च रोजी त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध 131 धावांची खेळी केली होती. तसेच काहीच दिवसांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने त्याच्या वाढदिवशी बंगळुरूला पाकिस्तानविरुद्धच 121 धावांची खेळी केली होती.

वाढदिवशी वनडे शतक करणारे क्रिकेटपटू

  • 100* धावा - विनोद कांबळी (18 जानेवारी 1993, भारत विरुद्ध इंग्लंड, जयपूर)

  • 134 धावा - सचिन तेंडुलकर (24 एप्रिल 1998, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह)

  • 130 धावा - सनथ जयसूर्या (30 जून 2008, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कराची)

  • 131*धावा - रॉस टेलर (8 मार्च 2011, न्यूझीलंज विरुद्ध पाकिस्तान, पाल्लेकेले)

  • 140* धावा - टॉम लॅथम (2 एप्रिल 2022, न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स,हेमिल्टन)

  • 121 धावा - मिचेल मार्श (20 ऑक्टोबर 2023, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, बंगळुरू)

  • 101* धावा - विराट कोहली (5 नोव्हेंबर 2023, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता)

भारताचा विजय

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात भारताकडून विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27.1 षटकात सर्वबाद 83 धावाच करता आल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT