Virat Kohli BCCI News Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Retirement: इंग्लंड दौऱ्यापूर्वी BCCI ला मोठा धक्का! हिटमॅननंतर किंग कोहली घेणार कसोटीतून निवृत्ती?

Virat Kohli Announces Retirement from Test: बीसीसीआयने कोहलीला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचारण्याची विनंती केली असली तरीही विराटनेअद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही

Akshata Chhatre

virat kohli test retirement news: भारतीय क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवला आहे. 'इंडियन एक्सप्रेस'मधील एका वृत्तानुसार, यानंतर बीसीसीआयने कोहलीला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचारण्याची विनंती केली असली तरीही विराटनेअद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

भारतीय निवड समिती काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे आणि कोहलीच्या या निर्णयामुळे त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जर कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा मधल्या फळीचा अनुभव कमी असेल.  

रोहितनंतर विराटचा अलविदा?

मागच्या काही काळापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनाही कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता आणि त्यामुळे त्यांच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते.

रोहित शर्माबाबत बीसीसीआयची भूमिका स्पष्ट नसली तरी, इंग्लंड दौऱ्यासाठी कोहली संघात असावा, असे मंडळाला निश्चितपणे वाटत होते. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर इंग्लंडमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी कोहलीच्या नावावरही चर्चा झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर कोहली त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दल विचार करत होता. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले, पण त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला विशेष योगदान देता आले नाही. कोहलीने भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले असून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्याने ३७ सामन्यांमध्ये केवळ तीन शतकांसह १९९० धावा केल्या आहेत.

शुभमन गिल भारताचा कर्णधार

आता जर का कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला, तर ऋषभ पंत आणि केएल राहुल हे मधल्या फळीतील सर्वात अनुभवी खेळाडू असतील. कसोटी क्रिकेटमधील अलीकडील खराब कामगिरी असूनही, शुभमन गिलला या मालिकेसाठी भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त केला जाण्याची शक्यता आहे. विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूचा कसोटी क्रिकेटमधून अचानक घेतलेला हा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी निश्चितच एक मोठा धक्का आहे आणि आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघाच्या रणनीतीवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT