Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासला खांदा मारणे विराटला भोवले; ICC ने ठोठावला मॅच फीच्या 20 टक्के दंड

India Vs Australia: क्रिकेटमध्ये दुसऱ्या खेळाडूला धक्का देण्यास आयसीसीच्या नियमावलीनुसार चुकीचे आहे.
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासला खांदा मारणे विराटला भोवले; ICC ने ठोठावला मॅच फीच्या 20 टक्के दंड
Virat Kohli And Sam Konstas Incident| India Vs Australia
Published on
Updated on

India Vs Australia

ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासला खांद्यावर टक्कर देणे विराट कोहलीला चांगलेच भोवले आहे. आयसीसीने विराटवर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे तसेच, एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. एमसीजी येथे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोट सामन्यात गुरुवारी सकाळी कोहली आणि कोन्स्टास यांची धडक झाली.

क्रिकेटमध्ये दुसऱ्या खेळाडूला धक्का देण्यास आयसीसीच्या नियमावलीनुसार चुकीचे आहे. आयसीसीच्या आचारसंहितेत कलम २.१२ नुसार अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने कोणत्याही खेळाडूला किंवा अम्पायरला धक्का देणे क्रिकेटमध्ये प्रतिबंधित आहे.

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासला खांदा मारणे विराटला भोवले; ICC ने ठोठावला मॅच फीच्या 20 टक्के दंड
गोव्यात मराठी नाट्यस्पर्धेचा बिगुल! 18 नाटकांची मेजवानी; वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा..

अशा प्रकारच्या घटनांचे गांभीर्य ठरविण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

१) घटना कोणत्या परिस्थितीत घडली याबाबत विचार केला जातो. म्हणजेच जाणिवपूर्वक धक्का दिला का? किंवा ही घटना टाळण्यासाठी संधी होती का?

२) दोन खेळाडूंमध्ये आलेल्या संपर्कात जोर किती होता.

३) संपर्क आल्यानंतर किंवा या प्रसंगात कोणाला इजा झाली का?

एमसीजीच्या मैदानावर काय घडलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात गुरुवारी दहावी ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांच्या शाब्दीक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. विराटने सॅम कोन्स्टासला खांद्याने धक्का दिल्याची घटना घडली. यामुळे मैदानावर काहीसे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उस्मान ख्वाजाने मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासला खांदा मारणे विराटला भोवले; ICC ने ठोठावला मॅच फीच्या 20 टक्के दंड
New Year Celebration: ..आठवडाभर गोव्यात धूमधाम! 72 पार्ट्या आणि 119 संगीत कार्यक्रम; मलायका, उर्वशीचे Performances

याप्रकरणावरुन भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील विराटने केलेले कृत्य अनावश्यक असल्याचे मत मांडले. क्रिकेटमध्ये एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा कोणीही ओलांडू नये, असे शास्त्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com