क्रीडा

Viral Video: वनडे मालिका खिशात घातलाच विराट-ईशानचा भन्नाट डान्स, फॅन्सकडूनही उत्फूर्त प्रतिसाद

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेनंतर विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला विराट आणि ईशान यांच्या डान्सचा व्हिडिओ श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर विजय मिळवल्यानंतरचा असल्याचे म्हटले जात आहे.

त्यांनी मैदानात सामन्यानंतर चाहत्यांसमोर काही डान्स स्टेप्स केल्या. ज्याला चाहत्यांकडूनही प्रतिसाद मिळाला. हा व्हिडिओ अनेक चाहत्यांच्या पसंतीसही उतरला असून त्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

(Virat Kohli and Ishan Kishan dance video after India vs Sri Lanka ODI goes Viral)

दरम्यान, ईशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही वनडेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी शुभमन गिलला पसंती देण्यात आली आहे. तर, विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक करत वर्षाची सुरुवात शानदार केली आहे. पण दुसऱ्या वनडेत तो 4 धावाच करू शकला.

दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिकने 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 39.4 षटकात 215 धावांवरच संपुष्टात आला.

त्यानंतर 216 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही चांगली झाली नव्हती. भारताने 86 धावांतच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर केएल राहुलने जबाबदारी स्विकारत पहिल्यांदा हार्दिक पंड्याला साथीला घेत 75 धावांची भागीदारी केली.

हार्दिक 36 धावांवर बाद झाल्यानंतर त्याने अक्षर पटेलबरोबर 30 धावांची भागीदारी केली. अक्षरने 21 धावा केल्या. यादरम्यान केएल राहुलने त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 64 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे भारताने 43.2 षटकात 219 धावा करत सामना जिंकला.

या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने 67 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसरा सामनाही जिंकला आहे. त्यामुळे तिरुअनंतपुरमला 15 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत पूर्ण वर्चस्व राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर श्रीलंका संघ व्हाईटवॉश टाळण्याच्या प्रयत्नात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT