Virat Kohli's Fan Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: किंग कोहलीसाठी नवरोबा ठरला लकी! लग्नाच्या दिवशी घडला असा चमत्कार...!

Virat Kohli's Fan: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नाही.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Centuary On Fan’s Wedding: प्रार्थनेत इतकी ताकद असते की, अशक्य गोष्टीही शक्य होतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रिय व्यक्तीसाठी अशी प्रार्थना केली, आणि त्यासाठी काहीतरी मागितले, प्रत्यक्षात ते पूर्ण झाले तर याला आपण चमत्कारच म्हणतो.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नाही. तो बराच काळ खराब फॉर्मशी झुंजत होता. सप्टेंबर 2022 पूर्वी, विराट कोहलीने डिसेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले.

दुसरीकडे, चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत त्याने आपला दुष्काळ संपवला आणि अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून फॉर्ममध्ये परतला. आता विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये येण्यामागे त्याच्या खास चाहत्याचाही हात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

विराट कोहलीच्या चाहत्यांच्या प्रार्थना कामी आल्या

होय, विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका डाय हार्ड फॅन्सने स्टेडियममध्ये येऊन चीअर बोर्डवर अशी गोष्ट लिहिली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या चिअर बोर्डवर लिहिले होते की, "विराट कोहली त्याचे 71 वे शतक पूर्ण करेपर्यंत मी लग्न करणार नाही." त्याने आशिया चषकात आपले 71 वे शतक झळकावले आणि नुकतेच श्रीलंकेविरुद्ध 74 वे शतक झळकावले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चाहत्याने चीअर बोर्ड घेत विराट कोहलीच्या शतकानंतरच लग्न करणार असल्याचा दावा केला होता. विराट कोहलीने लग्नाच्या दिवशीच नाबाद 166 धावा केल्या होत्या.

त्याबदल्यात विराट कोहलीनं मोठं सरप्राईज दिलं

विराट कोहलीच्या शतकानंतर वराच्या वेशभूषेत असलेल्या व्यक्तीने टीव्हीसमोर उभे राहून फोटो काढला आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमन अग्रवाल नावाच्या विराटच्या चाहत्याने ट्विटरवर फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ""मी 71वे शतक मागितले, पण त्याने माझ्या खास दिवशी 74 वे शतक झळकावले."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT