Virat Kohli: वनडेत किंग कोहलीच्या 5 दीडशतकी खेळी

Pranali Kodre

भरवशाचा फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय शतके

विराटने त्याच्या कारकिर्दीत 78 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

वनडे शतके

यामधील 48 शतके त्याने वनडे प्रकारात केली आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

दीडशतके

विराटने 48 शतकांपैकी 5 वेळा 150 धावांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

पहिले दीडशतक

विराटने सर्वात आधी 2012 साली पहिल्यांदा वनडेत 150 धावांचा टप्पा पार केला होता.

Virat Kohli

सर्वोच्च खेळी

विराटने पाकिस्तान विरुद्ध 2012 साली मिरपूरला 183 धावांची खेळी केली होती. ही त्याची वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी देखील आहे.

तिसरे दीडशतक

त्यानंतर विराटने न्यूझीलंडविरुद्ध 2016 साली मोहाली वनडेमध्ये नाबाद 154 धावांची खेळी केली होती.

Virat Kohli

2018 मध्ये दोन दीडशतके

विराटने 2018 साली दोनवेळा वनडेत 150 धावांचा टप्पा पार केला होता.

Virat Kohli

2018 मधील खेळी

त्याने 2018 साली केपटाऊनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 160 आणि विशाखापट्टणमला वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 157 धावांची खेळी केली होती.

Virat Kohli

पाचवे दीडशतक

त्यानंतर त्याने 15 जानेवारी 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे नाबाद 166 धावांची खेळी केली. हे त्याचे वनडेतील पाचवे दीडशतक होते.

Virat Kohli
MS Dhoni | Dainik Gomantak