Virat Kohli Dance on Naatu Naatu
Virat Kohli Dance on Naatu Naatu Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Dance: किंग कोहलीलाही चढली 'नाटू नाटू'ची क्रेझ, लाईव्ह मॅचमध्येच सुरु केला डान्स

Pranali Kodre

Virat Kohli Dance on Naatu Naatu: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारी वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताला विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता.

या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताने ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात 188 धावांवरच रोखले.

याच डावादरम्यान, विराटही अगदी रिलॅक्स आणि मस्तीमध्ये दिसत होता. त्याने एका क्षणी प्रेक्षकांचे लोकप्रिय झालेल्या 'नाटू नाटू' गाण्याच्या काही डान्स स्टेप्सही केल्या. तो डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'नाटू नाटू' हे प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट 'आरआरआर' मधील गाणे असून या गाण्याला काही दिवसांपूर्वीच ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. ऑस्कर जिंकणारे भारतीय निर्मितीचे हे पहिले गाणे ठरले. विराट या गाण्यावर डान्स करत असतानाचा व्हिडिओ आरआरआरच्या अधिकृत ट्वीटर हँडेलवरही शेअर करण्यात आला होता. मात्र कॉपीराईटच्या समस्येमुळे तो नंतर डिलीट करण्यात आला.

फलंदाजीत विराट अपयशी

मुंबई वनडेत क्षेत्ररक्षणादरम्यान जरी विराट मस्तीच्या मूडमध्ये दिसला असला, तरी फलंदाजीत मात्र त्याची निराशा झाली. तो केवळ 4 धावांवर मिशेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. महत्त्वाचे म्हणजे स्टार्कने पहिल्यांदाच विराटला वनडेत बाद केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी खास झाली नव्हती. भारताने 39 धावातच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या (25) यांच्यात 44 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्यात नाबाद 108 धावांची भागीदारी झाली.

त्यामुळे भारताने 40 व्या षटकातच 5 बाद 191 धावा करत सामना आपल्या नावे केला. केएल राहुलने नाबाद 75 धावांची आणि जडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली.

जडेजाने गोलंदाजीवेळीही चांगले योगदान दिले होते. त्याने 2 विकेट्स घेण्याबरोबरच एक चांगला झेलही घेतला. त्यामुळे त्याच्या अष्टपैलू योगदानासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जडेजा व्यतिरिक्त गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही चांगले योगदान दिले. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत मिशेल मार्शने शानदार खेळी करताना 81 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa Election 2024 Live: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT