Vinesh Phogat | Yogeshwar Dutt Dainik Gomantak
क्रीडा

Vinesh Phogat on Yogeshwar Dutt: ऑलिंपिकपटूंमध्ये जुंपली! 'योगेश्वरसारखा जयचंद कुस्तीत असेल, तोपर्यंत...', विनेशचे प्रत्युत्तर

कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि विनेश फोगाट यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे.

Pranali Kodre

Vinesh Phogat slams Yogeshwar Dutt: गेल्या काही महिन्यांपासून कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध आंदोलन करत आहेत. हे आंदोलन बरंच चर्चेत आहे. आता आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंपैकी एक असलेल्या विनेश फोगटने योगेश्वर दत्तवर निशाणा साधला आहे.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया असे काही पदक विजेते खेळाडू आहेत. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या सहा कुस्तीपटूंना आगामी एशियन गेम्सच्या ट्रायल्ससाठी सुट देण्यात आली आहे. याबद्दलच कुस्तीपटू योगेश्वर दत्तने प्रश्न उपस्थित केला आहे. यावर विनेशने परखड शब्दात प्रत्युत्तर केले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे काम पाहणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन समितीने आंदोलनकर्त्या ६ कुस्तीपटूंना ट्रायल्समध्ये सुट दिली आहे. याबद्दल योगेश्वर दत्तने व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे.

योगेश्वर दत्तने म्हटले आहे की कोणत्या निकषाच्या आधारे सहा कुस्तीपटूंना थेट अंतिम ट्रायल्समध्ये सहभागी केले जाणार आहे. जर असे ट्रायल्स घेतले जाणार असतील, तर ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी दहिया, दीपक पुनिया, अंशु मलिक, सोनल मलिक अशा भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनाही अशी संधी दिली जावी, केवळ सहा कुस्तीपटूंना सुट देणे, माझ्यामते चुकीचे आहे.

तसेच त्याने म्हटले आहे की सर्व खेळाडूंनी याबद्दल आवाज उठवायला पाहिजे. प्रधानमंत्री आणि क्रीडामंत्र्यांना याबद्दल पत्र लिहिले पाहिजे.

विनेशचे प्रत्युत्तर

विनेशने लिहिले आहे की 'योगेश्वर दत्त महिला कुस्तीपटूंसाठी बनवलेल्या दोन्ही समित्यांचा भाग होता. जेव्हा समितीसमोर महिला कुस्तीपटू त्यांच्या अडचणी ऐकवत होत्या, तेव्हा तो खूप वाईटपद्धतीने हसत होता. जेव्हा २ महिला कुस्तीपटू पाणी पिण्यासाठी बाहेर आल्या, तेव्हा तो त्यांला म्हणाला की ब्रिजभूषणचे काही होणार नाही, तुम्ही जाऊन सराव करा.'

'एका दुसऱ्या महिला कुस्तीपटूला वाईट पद्धतीने म्हणाला की हे सर्व होत रहाते, याला एवढा मोठा विषय बनवू नका. काही हवे असेल, तर मला सांगा. बैठकीनंतर योगेश्वरने महिला कुस्तीपटूंचे नाव ब्रिजभूषण आणि मीडियामध्ये लीक केले होते. त्याने अनेक महिला कुस्तीपटूंच्या घरी फोन करत तुमच्या मुलींना समजवा असे सांगितले होते.'

'तो सुरुवातीला खुलेपणाने महिला कुस्तीपटूंच्या विरुद्ध भाष्य करत होता. त्यानंतरही त्याला दोन्ही समित्यांमध्ये ठेवण्यात आले होते. तो कुस्तीपटूंना आणि प्रशिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखत होता. सर्व कुस्तीविश्वाला कळाले होते की योगेश्वर ब्रिजभूषणच्या ताटातील उष्टे खात आहे.'

याशिवाय देखील विनेशने योगेश्वरवर अनेक आरोप केले आहेत. तसेच तिने त्याला आव्हानही दिले की तो पुन्हा निवडणूक जिंकणार नाही. तसेच तिने असेही म्हटले की तो जुलूम करणाऱ्यांचीच खुशामत करत आहे.

तसेच तिने पोस्टच्या अखेरीस लिहिले की 'योगेश्वरसारखा जयचंद जोपर्यंत कुस्तीत राहील, तोपर्यंत अत्याचारी लोकांचे मनोधैर्य उंचावत राहिल.'

दरम्यान ब्रिजभूषणवर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याचा आरोप काही कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले होते. ब्रिजभूषणवर कारवाई केली जावी अशी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची मागणी आहे.

या आंदोलनानंतर 15 जून रोजी दिल्ली पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, पॉक्सो प्रकरणातून त्यांना क्लीन चीट मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

SCROLL FOR NEXT