Vinesh Phogat Dainik Gomantak
क्रीडा

Vinesh Phogat: विनेश फोगटने आता उचलले मोठे पाऊल, खेलरत्नसह हा पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

Vinesh Phogat: विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.

Manish Jadhav

Vinesh Phogat: कुस्ती महासंघाच्या निवडणुका आणि लैंगिक छळाचे आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खेळाडूंनी पुन्हा एकदा मोर्चा खोलला. याचा परिणाम असा झाला की, क्रीडा मंत्रालयाने या संघटनेला निलंबित केले. मात्र, तरीही खेळाडूंचा राग शांत झालेला नाही. साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानंतर आता विनेश फोगटनेही मोठी घोषणा केली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न परत करण्याची घोषणा केली आहे.

विनेशने हे पाऊल उचलले

विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. तिने लिहिले की, 'साक्षीने कुस्ती सोडली आणि बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करण्याची वेळ का आली? संपूर्ण देशाला हे सर्व माहीत आहे आणि तुम्ही देशाचे प्रमुख (पंतप्रधान मोदी) आहात. मला 2016 हे वर्ष आठवतं. साक्षीने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर तुमच्या सरकारने तिला बेटी बचाओ आणि बेटी पढाओची ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते.'

विनेशने पुढे लिहिले की, ''आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला 2016 हे वर्ष आठवलं. आम्ही महिला खेळाडू सरकारी जाहिरातींमध्ये दिसण्यासाठी आहोत का? मात्र आमचं आयुष्य त्या जाहिरातींसारखं अजिबात नाही. महिला कुस्तीपटूंची गेल्या काही वर्षात जी काही अवस्था झाली आहे. त्यामुळे आम्ही किती गुदमरुन जगतोय हे समजले असेल. त्यामुळे आता मला (विनेश) पुरस्काराच्या ओझ्यातून मुक्त व्हायचे आहे. कारण ते स्वप्न होते आणि आता जे घडत आहे ते वास्तव आहे. मला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार देण्यात आला, ज्यांचा आता माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही.''

2016 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला

हरियाणातील 29 वर्षीय महिला कुस्तीपटू जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू आहे. विनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. 2019 मध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालेली ती पहिली अॅथलीट होती. त्यांना 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2018 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. विनेशला 2020 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, मेजर ध्यानचंद खेलरत्न देखील मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT