Indian Wrestlers Protest
Indian Wrestlers Protest Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: 'क्रिकेटर्सचे मौन का, घाबरतात का?', विनेश फोगटने विचारले तिखट प्रश्न

Pranali Kodre

Vinesh Phogat expressed disappointment on Indian Cricketers: भारताचे स्टार कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांची भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रीजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपाबाबत एफआयआर दाखल करण्याची मागणी आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला अनेकांकडून पाठिंबाही मिळत आहे.

पण अद्याप क्रिकेट क्षेत्रातून या प्रकरणाबाबत मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. याबद्दल आता कुस्तीपटू विनेश फोगट हिने प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने म्हटले आहे की क्रिकेटपटूंनी याबद्दल त्यांचे मत मांडायला हवे.

विनेश इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाली, 'संपूर्ण देश क्रिकेटची पुजा करते. पण एकही क्रिकेटपटूने याबद्दल भाष्य केलेले नाही. आम्ही असे म्हणत नाही की तुम्ही आमच्या बाजूने बोला, पण कमीतकमी तटस्थ मत तरी मांडा आणि सांगा की कोणत्याही बाजूने असो, पण न्याय मिळाला पाहिजे. क्रिकेट, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग... अशा अनेक खेळामधील खेळाडूंनी मौन स्विकारल्याचे वाईट वाटत आहे.'

तसेच विनेशने असेही म्हटले की 'असे नाहीये की आपल्या देशान मोठे खेळाडू नाही. क्रिकेटपटू आहेत. अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळीसाठी त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवला होता. आमची तेवढीही लायकी नाही का?'

'तुम्ही आम्ही काही जिंकले की आमचे अभिनंदन करण्यासाठी पुढे येता. अगदी क्रिकेटपटूही आमच्या यशाबद्दल ट्वीट करतात. पण आता काय झाले. तुम्ही प्रशासनाला घाबरतात का? किंवा मग त्यामध्ये काहीतरी संशयास्पद आहे.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गुरुवारी भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी इंस्टाग्रामवर कुस्तीपटूंचा फोटो शेअर करत 'त्यांना न्याय मिळणार आहे का?' अशा अर्थाचे कॅप्शनही टाकले होते.

Kapil Dev Instagram Story

तसेच भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा आणि अभिनव बिंद्रा यांनीही कुस्तीपटूंना पाठिंबा देताना ट्वीट करत निष्पक्ष चौकशीही मागणी केली आहे.

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी.टी उषा यांनी कुस्तीपटूंनी बेशिस्तपणे हे आंदोलन करत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांच्या रस्त्यावर उतरून अंदोलन करण्याने देशाची प्रतिमाही खराब होत असल्याचे म्हटले होते.

याबद्दलही विनेशने नाराजी व्यक्त केली असून तिने म्हटले की पी.टी उषा यांच्या विधानाला असंवेदनशील म्हटले. तसेच तिने असेही म्हटले आहे की 'आम्ही रस्त्यावर उतरण्यामागे काहीतरी कारण असेलच ना.' याशिवाय विनेशने सांगितले की तिने पी. टी. उषा यांना फोनही केला होता, पण त्यांनी उचलला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT