Delhi Wrestlers Protest: कुस्ती संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
Delhi
DelhiDainik Gomantak
Published on
Updated on

Wrestlers Protest Against WFI Chief Brij Bhushan Sing: टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया पुन्हा एकदा भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू करणार आहेत.

आम्ही पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करणार असून जोपर्यंत WFI अध्यक्षांना अटक होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुस्तीपटू या प्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

सात महिला कुस्तीपटूंची तक्रार

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कॅनॉट पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करत आहोत आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. हरियाणा आणि बाहेरील कुस्तीपटूंकडून एकूण सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी एफआयआर न नोंदवल्याबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. महिला कुस्तीपटूंनी आयोगाकडे तक्रार केली आहे की त्यांनी 2 दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना लेखी तक्रार दिली होती, परंतु अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

Delhi
Maruti Gypsy EV Launched: मारुती जिप्सीचे इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च, भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल

ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुस्तीपटू आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

यानंतर ते धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत जंतरमंतरवर निदर्शने केली होती.

रेसलर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी अश्लील भाषेचा वापर करून खेळाडूंना शिवीगाळ केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.

विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तो लैंगिक छळ करतो, असेही त्याने प्रशिक्षकाविषयी सांगितले. मी आवाज उठवला. WFI अध्यक्ष महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करतात. ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे पैलवानांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com