Bangladesh Vs Zimbabwe: वेस्ट इंडिजनंतर आता भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची धुरा शिखर धवनच्या हाती असणार आहे. भारतीय संघाच्या आगमनापूर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकाब्वाने मोठा धमाका केला आहे. त्याने 14 वर्षांनंतर कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
दरम्यान, रेगिस चकाब्वाच्या (Regis Chakabwa) वनडे करिअरची सुरुवात 2008 मध्ये केनियाविरुद्ध झाली होती, मात्र आता 2022 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक बांगलादेशविरुद्ध झळकले आहे. बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने हे शतक झळकावले आहे. चकाब्वाने अवघ्या 75 चेंडूंत 102 धावांची धडाकेबाज खेळी खेळली, ज्यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. चकाब्वाचा स्ट्राईक रेट त्याच्या पहिल्या एकदिवसीय शतकादरम्यान 136 होता.
दुसरीकडे, त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, 14 वर्षांपूर्वी त्याने पहिला वनडे खेळला होता. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केनियाविरुद्ध केली. तेव्हापासून तो आत्तापर्यंत 55 वनडे खेळला आहे. भारतीय संघाला आता वेस्ट इंडिजच्या (West Indies) दौऱ्यावर जायचे आहे, जिथे भारतीय संघाला शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली 3 वनडे सामने खेळायचे आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.