भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया विझागमध्ये पोहोचली आहे. भारतीय संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर हातची मालिका गमावेल. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकून मालिका काबीज करणे टिम इंडियासाठी गरजेची आहे. (India vs South Africa, 3rd T20I)
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसत आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या टी-20साठी विशाखापट्टणमला पोहोचला आहे. येथे भारतीय खेळाडूंचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यासोबतच स्थानिक बँडही बोलावण्यात आले. टीम इंडियाचे खेळाडू श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि उमरान मलिकही या व्हिडिओमध्ये दिसले.
विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना दिल्लीत झाला होता. यामध्ये भारताला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. तर दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाला 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कटक येथे खेळला गेला. आता तिसरा टी-20 सामना विशाखापट्टन येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील चौथा सामना 17 जूनला राजकोटमध्ये तर पाचवा सामना 19 जूनला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलने आतापर्यंत 6.1 षटकात एकूण 75 धावा दिल्या आहेत, तर या कालावधीत केवळ एक विकेट घेतली आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेल दुसऱ्या T20 मध्ये किफायतशीर ठरला असावा. मात्र, आतापर्यंत तोही आपला आयपीएल फॉर्म दाखवण्यात अपयशी ठरला आहे. अक्षर पटेलने सर्वाधिक निराश केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.